Gold Price Today : गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या किमती सातत्याने वाढत आहेत. सध्या लग्न सराईचा सिझन सुरू आहे म्हणून या मौल्यवान धातूंच्या खरेदीत वाढ झाली आहे आणि अशा परिस्थितीतच सोन्याच्या किमतीत वाढ होत असल्याने सर्वसामान्य जनता फार त्रस्त झाली आहे. सोन्याने आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत.
दरम्यान, जर ही वाढ अशीच सुरू राहिली तर लवकरच सोन्याचा भाव 90,000 रुपयांचा टप्पा पार करेल किंवा सोने एक लाख रुपयांचा टप्पा देखील गाठू शकते, असे म्हटले जात आहे. बाजारातील अभ्यासकांनी सांगितल्याप्रमाणे, कमकुवत डॉलर निर्देशांक आणि यूएस टॅरिफ धोरणांमुळे सोन्याच्या किमती वाढत आहेत.

जागतिक व्यापार आणि आर्थिक दृष्टीकोनातील अनिश्चिततेमध्ये, सुरक्षित आश्रयस्थान म्हणून सोन्यात गुंतवणूक वाढत आहे आणि किंमती मजबूत होत आहेत. दरम्यान आज आपण 16 फेब्रुवारी 2025 रोजी सोन्याला देशातील प्रमुख शहरांमध्ये काय दर मिळतोय महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याच्या बाजारभावाची स्थिती कशी आहे? याचाच सविस्तर आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील सोन्याचे भाव कसे आहेत?
पुणे : 16 फेब्रुवारी 2025 रोजी पुण्यात 22 कॅरेट गोल्ड ची किंमत 78 हजार 900 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट गोल्ड ची किंमत 86 हजार 70 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी आहे. तसेच येथे 18 कॅरेट गोल्ड ची किंमत 64,560 रुपये इतकी नमूद केली जात आहे.
मुंबई : देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राचे राज्य राजधानी मुंबईत आज 22 कॅरेट गोल्ड ची किंमत 78 हजार 900 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट गोल्ड ची किंमत 86 हजार 70 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी आहे. तसेच येथे 18 कॅरेट गोल्ड ची किंमत 64,560 रुपये इतकी नमूद केली जात आहे.
कोल्हापूर : येथे आज 22 कॅरेट गोल्ड ची किंमत 78 हजार 900 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट गोल्ड ची किंमत 86 हजार 70 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी आहे. तसेच येथे 18 कॅरेट गोल्ड ची किंमत 64,560 रुपये इतकी नमूद केली जात आहे.
भिवंडी : आज इथं 22 कॅरेट गोल्ड ची किंमत 78930 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट गोल्ड ची किंमत 86 हजार 100 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली आहे. तसेच 18 ग्रॅम गोल्ड ची किंमत 64,590 एवढी आहे.
लातूर : आज लातूर येथे 22 कॅरेट गोल्ड ची किंमत 78 हजार 930 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट गोल्ड ची किंमत 86 हजार 100 रुपये इतकी नमूद करण्यात आली आहे. तसेच 18 ग्रॅम गोल्ड ची किंमत 64,590 एवढी आहे.
नाशिक : आज नाशिकला 22 कॅरेट गोल्ड ची किंमत 78 हजार 900 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट गोल्ड ची किंमत 86 हजार 70 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी आहे. तसेच येथे 18 कॅरेट गोल्ड ची किंमत 64,560 रुपये इतकी नमूद केली जात आहे.
नागपूर : आज उपराजधानी नागपूर येथे 22 कॅरेट गोल्ड ची किंमत 78 हजार 900 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट गोल्ड ची किंमत 86 हजार 70 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी आहे. तसेच येथे 18 कॅरेट गोल्ड ची किंमत 64,560 रुपये इतकी नमूद केली जात आहे.