Gold Rate : सोन्याच्या किमतीत आज सलग तिसऱ्या दिवशी वाढीचा ट्रेंड पाहायला मिळाला आहे. त्याआधी सोन्याच्या किमती सातत्याने घसरत होत्या. 23 जूनला सोन्याची किंमत एका लाखाच्या वर होती मात्र त्यानंतर सोन्याच्या किमती एका लाखापेक्षा कमी झाल्या आहेत.
24 जून रोजी 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत 99 हजार 220 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 22 कॅरेटची किंमत 90 हजार 950 रुपये एवढी होती. दरम्यान 24 तारखेनंतरही रेटमध्ये सतत घसरण होत राहिली.

30 जून 2025 रोजी 24 कॅरेटची किंमत 97 हजार 260 रुपये प्रति दहा ग्राम आणि 22 कॅरेट ची किंमत 89 हजार 150 रुपये प्रति दहा ग्राम एवढी राहिली.
मात्र या महिन्याच्या सुरुवातीला या मौल्यवान धातूच्या किमतीत पुन्हा एकदा वाढ झाली. एक जुलै 2025 रोजी या मौल्यवान धातूची 24 कॅरेट ची किंमत 98 हजार चारशे रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 22 कॅरेट ची किंमत 90 हजार 200 एवढी नमूद करण्यात आली.
काल अर्थातच दोन जुलै 2025 रोजी 24 कॅरेट ची किंमत 98,890 रुपये प्रति दहा ग्राम आणि 22 कॅरेट ची किंमत 90 हजार 650 रुपये एवढी राहिली आहे.
दरम्यान आजही या मौल्यवान धातूच्या किमतीत वाढ झाली असून आज आपण 3 जुलै 2025 रोजी 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचे रेट महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये कसे आहेत याचा आढावा घेणार आहोत.
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, कोल्हापूर, जळगावमधील सोन्याचे रेट कसे आहेत?
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, कोल्हापूर, जळगाव या राज्यातील प्रमुख शहरांमध्ये 18 कॅरेट सोन्याची किंमत 74,180 रुपये प्रति दहा ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत 90,660 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 98 हजार 900 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी राहिली आहे. म्हणजेच आजही या शहरांमध्ये सोन्याच्या किमतीत वाढ झाली आहे.
नाशिक, लातूर, वसई विरार, भिवंडी मधील सोन्याचे रेट कसे आहेत?
नाशिक, लातूर, वसई विरार, भिवंडी या राज्यातील प्रमुख शहरांमध्ये 18 कॅरेट सोन्याची किंमत 74,210 रुपये प्रति दहा ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत 90,690 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 98 हजार 930 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी राहिली आहे. म्हणजेच आजही या शहरांमध्ये सोन्याच्या किमतीत वाढ झाली आहे.