Gold Rate Hike : गेल्या काही महिन्यांपासून सोन्याचे दर कमालीचे तेजीत आहेत. गेल्या महिन्यात अर्थातच एप्रिल सोन्याच्या किमतीने एक नवीन रेकॉर्ड तयार केला होता. या नव्या वर्षाच्या अगदी सुरुवातीपासूनच सोन्याच्या किमती सातत्याने वाढत आहेत.
22 एप्रिल 2025 रोजी या मौल्यवान धातूच्या किमतीने आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडले. 22 एप्रिल रोजी सोन्याची किमत एक लाख रुपयांच्या वर होती. या दिवशी 24 कॅरेट शुद्ध सोने एक लाख एक हजार 350 रुपये प्रति दहा ग्रॅम म्हणजेच प्रति तोळा या दरात उपलब्ध होते.

मात्र त्यानंतर सातत्याने सोन्याच्या किमती कमी होत राहिल्यात. पण, अजूनही सोन्याच्या किमती एका लाखाच्या आसपास आहेत, यामुळे सोने अजूनही सर्वसामान्य ग्राहकांच्या आवाक्या बाहेरच आहे. अशा परिस्थितीत आता आपण पुढील वर्षी सोन्याचे दर कसे राहतील याचा एक आढावा घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत.
सोन्याचे सध्याचे भाव
सध्या महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये 18 कॅरेट सोन्याचे भाव 74 हजार 10 रुपये प्रति दहा ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचे भाव 90 हजार 450 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचे भाव 98 हजार 680 रुपये प्रति दहा ग्रॅम असे आहेत.
या महिन्याच्या सुरुवातीला म्हणजेच एक मे 2025 रोजी 22 कॅरेट सोने 87 हजार 750 रुपये आणि 24 कॅरेट सोने 95,730 रुपये प्रति दहा ग्राम या दरात उपलब्ध होत होते. म्हणजेच गेल्या दहा दिवसांच्या काळात सोन्याच्या किमती बऱ्याच वाढल्या आहेत. 24 कॅरेट शुद्ध सोन्याच्या किमती गेल्या दहा दिवसांच्या काळात तीन हजार रुपयांपेक्षा अधिक वाढल्या आहेत.
भविष्यात कशा राहणार किमती?
तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे भविष्यातही सोन्याच्या किमती अशाच तेजीत राहण्याची शक्यता आहे. या मौल्यवान धातूच्या वाढत्या मागणीमुळे सोन्याच्या किमती वाढत आहेत असे निरीक्षण तज्ञांनी नोंदवले आहे.
याची मागणी पाहता 2025 च्या अखेरीस सोन्याचा दर प्रति औंस 3700 डॉलर पर्यंत पोहोचू शकतो. त्यानंतर भारतात हा दर एक लाख 15 हजार रुपये प्रति तोळा होईल. पण, या वर्षाच्या अखेरीपर्यंत सोन्याच्या किमतीत चढ-उतार होत राहतील.
त्यानंतर, मात्र 2026 च्या दुसऱ्या तिमाहीपर्यंत म्हणजेच मार्चनंतर, आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याची किंमत प्रति औंस 4 हजार डॉलरचा टप्पा ओलांडू शकते. त्यावेळी भारतात सोन्याची किंमत एक लाख 25 हजार रुपये प्रति दहा ग्राम एवढी होईल.