Gold Rate : सोन – चांदी या मौल्यवान धातूंमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी तसेच सर्वसामान्य ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरे तर नुकताच तुळशी विवाह संपन्न झाला आहे आणि आता राज्यात तसेच देशात लग्न सराईचा सीजन सुरू होतोय.
दरवर्षी लग्नसराईच्या दिवसांमध्ये सोन्याच्या किमतीत वाढ होत असते आणि यावर्षी सुद्धा या मौल्यवान धातूच्या किमतीत प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना याचा फटका बसणार अशी शक्यता आहे तर यात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना याचा मोठा फायदा होणार आहे.

खरे तर या मौल्यवान धातूचे रेट सध्या एक लाख वीस हजार रुपये प्रति दहा ग्रॅम पर्यंत पोहचले आहेत. दरम्यान आता पुन्हा एकदा सोन्याच्या दरात मोठी वाढ होताना दिसत आहे.
गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या रेटमध्ये थोड्याफार प्रमाणात चढ-उतार सुरू आहे. मात्र पुढच्या काही महिन्यात सोन्याच्या किमती आणखी वाढतील अशी शक्यता लक्ष्मीडायमंडचे चेअरमन चेतन मेहता यांनी वर्तवली आहे.
आता आपण सोन्याच्या किमती किती वाढतील आणि या दरवाढीचे नेमके कारण काय असेल याबाबत थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
किती वाढतील सोन्याचे रेट?
दिवाळीनंतर सोन्याचे दर दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढलेले आहेत. दिवाळीनंतर काही दिवस सोन्याचे दर कमी झाले होते, त्यात मोठ्या प्रमाणात चढ-उतार सुरू होते. पण मात्र नंतर दरात सुधारणा झाली आणि दिवाळीनंतर साधारणतः दहा ते पंधरा टक्क्यांनी यामध्ये वाढ झाली आहे.
पुढे आता सोन्याच्या किमती आणखी वाढणार आहेत. पुढील काही महिन्यांमध्ये सोन्याच्या किमती जवळपास 10 ते 20 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. चेतन मेहता यांनी सांगितले की, यावर्षी सोना खरेदीदारांची संख्या वाढलेली आहे.
आता लग्नाच्या सीझनमध्ये पुन्हा एकदा सोन्याच्या दागिन्यांची मागणी वाढणार आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून एक खास ट्रेंड पाहायला मिळाला आहे. दिवाळीत जवळपास 40 ते 50 टक्के ग्राहकांनी जे सोने खरेदी केले ते एक्सचेंज केले होते.
लग्नाच्या सीझनमध्ये देखील अशीच स्थिती पाहायला मिळू शकते. पुढील तीन-चार महिन्यांमध्ये सोने एक्सचेंज 20 ते 30 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. यामुळे सोन्याचे दर भविष्यात आणखी वाढतील असा अंदाज आहे.
सद्यस्थितीला सोन्याचे रेट एक लाख 25 हजार रुपयांच्या आसपास आहेत, मात्र येत्या काळात यात 20 टक्क्यांची म्हणजेच पंचवीस हजार रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे.













