Gold Rate Today : जुलै महिन्याच्या शेवटी पुन्हा एकदा सोने तेजीत आले आहे. या मौल्यवान धातूच्या किमतीत आज तब्बल 660 रुपयांची वाढ झाली आहे. गेल्या पाच-सहा दिवसांपासून या मौल्यवान धातूच्या किमती दबावात होत्या पण आपण आज पुन्हा एकदा यात तेजी आली आहे.
या मौल्यवान धातूची किंमत 24 जुलै 2025 पासून सतत घसरत होती. 23 तारखेला 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत एक लाख 2 हजार 330 रुपये प्रति दहा ग्रॅम अशी होती मात्र काल 29 जुलै 2025 रोजी शुद्ध सोन्याची किंमत 99 हजार 820 रुपये प्रति दहा ग्रॅम अशी नमूद करण्यात आली.

दरम्यान आता पुन्हा एकदा शुद्ध सोन्याची किंमत एका लाखाच्या वर पोहोचली आहे. दुसरीकडे आज चांदीच्या किमतीत देखील वाढ नमूद करण्यात आली आहे. आज 30 जुलै रोजी चांदीची किंमत एक हजार रुपयांनी वाढली आहे.
30 जुलै रोजी चांदीची किंमत किती आहे?
23 जुलै रोजी चांदीची किंमत एक लाख 19 हजार रुपये प्रति किलो अशी होती. मात्र यानंतर चांदीच्या किमतीत किलोमागे 3000 रुपयांची घसरण झाली. काल 29 जुलै रोजी चांदीची किंमत एक लाख 16 हजार रुपये प्रति किलो अशी राहिली.
आज मात्र पुन्हा एकदा चांदीची किंमत किलोमागे 1000 रुपयांनी वाढली आहे. आज 30 जुलै रोजी चांदीची किंमत एक लाख 17 हजार रुपये प्रति किलो अशी नमूद करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.
सोन्याची लेटेस्ट किंमत किती ?
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, कोल्हापूर, जळगाव : या शहरांमध्ये 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत एक लाख 480 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 92 हजार 100 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 75 हजार 360 रुपये प्रति दहा ग्रॅम अशी नमूद करण्यात आली आहे.
नाशिक, लातूर, वसई विरार, भिवंडी : या शहरांमध्ये वर सांगितलेल्या शहरांपेक्षा सोन्याच्या किमती थोड्या अधिक असतात. ह्या शहरांमध्ये 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत एक लाख 510 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 92 हजार 130 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 75 हजार 390 रुपये प्रति दहा ग्रॅम अशी नमूद करण्यात आली आहे.