Gold Rate Today : सोन्याच्या किमतीत गेल्या दोन दिवसांच्या काळात जवळपास 2200 रुपयांची वाढ झाली आहे. 22 आणि 23 जुलै रोजी दहा ग्रॅम शुद्ध सोन्याची किंमत 2180 रुपयांनी वाढली असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे सोन खरेदी करू इच्छिणाऱ्या सर्वसामान्य ग्राहकांना याचा फटका बसतोय तर दुसरीकडे सोन्यात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना यामुळे थोडासा दिलासा मिळाला आहे.
खरे तर काल 22 जुलै रोजी 22 कॅरेट सोन्याची किंमत दहा ग्रॅम मागे 1050 रुपयांनी वाढली होती आणि 24 कॅरेट ची किंमत दहा ग्रॅम मागे 1140 रुपयांनी वाढली होती.

दरम्यान आज 23 जुलै रोजी 18 कॅरेट 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत दहा ग्रॅम मागे अनुक्रमे 780, 950 आणि 1040 रुपयांनी वाढली आहे. दुसरीकडे चांदीच्या किमतीत गेल्या पाच दिवसाच्या काळात मोठी वाढ झाली आहे. चांदीची किंमत किलो मागे 5 हजार 100 रुपयांनी वाढली आहे.
18 कॅरेट सोन्याची किंमत
आज 23 जुलै रोजी राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, कोल्हापूर, जळगाव या शहरांमध्ये 18 कॅरेट सोन्याची किंमत 76 हजार 750 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी आहे. तसेच नाशिक, वसई विरार, लातूर आणि भिवंडी या शहरांमध्ये 18 कॅरेटची किंमत 76 हजार 780 रुपये प्रति दहा ग्रॅम अशी नमूद करण्यात आली.
22 कॅरेट सोन्याची किंमत
आज 23 जुलै रोजी राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, कोल्हापूर, जळगाव या शहरांमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 93 हजार 800 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी आहे. तसेच नाशिक, वसई विरार, लातूर आणि भिवंडी या शहरांमध्ये 22 कॅरेटची किंमत 93 हजार 830 रुपये प्रति दहा ग्रॅम अशी नमूद करण्यात आली.
24 कॅरेट सोन्याची किंमत
आज 23 जुलै रोजी राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, कोल्हापूर, जळगाव या शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत एक लाख 2 हजार 330 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी आहे. तसेच नाशिक, वसई विरार, लातूर आणि भिवंडी या शहरांमध्ये 24 कॅरेटची किंमत एक लाख 2 हजार 360 रुपये प्रति दहा ग्रॅम अशी नमूद करण्यात आली.
चांदीची लेटेस्ट किंमत किती आहे
18 जुलै 2025 रोजी चांदीची किंमत एक लाख 13 हजार 900 रुपये प्रति किलो अशी होती. मात्र 19 जुलै रोजी चांदीची किंमत एक लाख 16 हजार रुपयांवर पोहोचली. त्यानंतर 21 जुलै पर्यंत किमती स्थिर राहिल्यात.
काल 22 तारखेला मात्र चांदीची किंमत एक लाख 18 हजार रुपये प्रति किलो इतकी होती. दरम्यान आज पुन्हा एकदा चांदीच्या किमतीत किलोमागे 1000 रुपयांची वाढ झाली आहे. आज 23 जुलै 2025 रोजी चांदीची किंमत 1 लाख 19 हजार रुपये प्रति किलो अशी आहे.