ग्राहकांना दिलासा ! सोन्याच्या किमतीत 4,900 रुपयांची घसरण ; 25 जुलै रोजी 10 ग्रॅम सोने खरेदीसाठी किती पैसे मोजावे लागणार ?

सोन आणि चांदी खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी आजची बातमी कामाची राहणार आहे. आज आपण सोन्याचे आणि चांदीचे लेटेस्ट चेक करणार आहोत.

Published on -

Gold Rate Today : सोन खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांना दिलासा देणारी बातमी समोर येत आहे, या मौल्यवान धातूच्या किमतीत आज पुन्हा मोठी घसरण झाली आहे. 24 जुलै 2025 रोजी या मौल्यवान धातूच्या 24 कॅरेटच्या किमती 100 ग्रॅम मागे 13600 रुपयांनी कमी झाल्यात.

आज देखील 24 कॅरेट शुद्ध सोन्याच्या किमती 100 ग्रॅम मागे 4,900 रुपयांनी कमी झाले आहेत. यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे तर सोन्यात गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना थोडे नुकसान सहन करावे लागणार आहे.

चांदीच्या किमतीत मात्र आज कोणताच बदल झालेला नाही. काल चांदीच्या किमती किलोमागे 1000 रुपयांनी कमी झाल्या होत्या पण आज ह्या मौल्यवान धातूच्या किमती स्थिर राहिल्या आहेत. आता आपण सोन आणि चांदीच्या 25 जुलै 2025 रोजी च्या लेटेस्ट किमती जाणून घेऊयात.

सोन्याच्या किमती कशा आहेत 

18 कॅरेट सोन्याच्या किमती : मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, कोल्हापूर, जळगाव या शहरांमध्ये आज 18 कॅरेट ची किंमत 75 हजार 360 रुपये प्रति दहा ग्राम इतकी आहे. तसेच नाशिक, लातूर, वसई विरार आणि भिवंडी या शहरांमध्ये आज 18 कॅरेटची किंमत 75 हजार 390 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी आहे. 

22 कॅरेट सोन्याच्या किमती कशा आहेत? : राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, कोल्हापूर, जळगाव या शहरांमध्ये आज 22 कॅरेटची किंमत 92 हजार 100 रुपये प्रति दहा ग्राम इतकी आहे. तसेच नाशिक, लातूर, वसई विरार आणि भिवंडी या शहरांमध्ये आज 22 कॅरेटची किंमत 92 हजार 130 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी आहे. 

24 कॅरेट सोन्याच्या किमती : राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, कोल्हापूर, जळगाव या शहरांमध्ये आज 24 कॅरेटची किंमत 1 लाख 480 रुपये प्रति दहा ग्राम इतकी आहे. तसेच नाशिक, लातूर, वसई विरार आणि भिवंडी या शहरांमध्ये आज 24 कॅरेटची किंमत 1 लाख 510 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी आहे. 

चांदीच्या किंमती कशा आहेत ?

सात – आठ दिवसांपूर्वी चांदीची किंमत एक लाख 13 हजार 900 रुपये प्रति किलो इतकी होती. मात्र 19 जुलै रोजी चांदीची किंमत एक लाख 16 हजार रुपये प्रति किलो एवढी झाली. पुढे 22 जुलै रोजी चांदीची किंमत एक लाख 18 हजार रुपये प्रति किलो एवढी झाली.

23 जुलैला किंमत एक लाख 19 हजार रुपयांवर पोहोचली. मात्र काल अर्थातच 24 जुलै 2025 रोजी चांदीच्या किमतीत 1000 रुपयांची घसरण झाली. दरम्यान आज चांदीची किंमत स्थिर आहे. आज 25 जुलै 2025 रोजी चांदीची किंमत एक लाख 18 हजार रुपये प्रति किलो अशी आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!