सोन्याच्या किमतीतील घसरण थांबण्याचे काही नाव घेईना ! 02 मे रोजी 22 आणि 24 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा भाव काय ?

सोन्याच्या किमतीतील घसरण आता काही थांबण्याचे नाव घेत नाहीये. आज सुद्धा सोन्याच्या किमती 220 रुपयांपर्यंत घसरल्या आहेत. दरम्यान आता आपण राज्यातील 22 कॅरेट, 24 कॅरेट अन 18 कॅरेट सोन्याची किंमत जाणून घेणार आहोत.

Updated on -

Gold Rate Today : 22 एप्रिलला सोन्याच्या किमतीने एका लाखाचा टप्पा पार केला, या दिवशी सोने एक लाख एक हजार 350 रुपये प्रति दहा ग्रॅम वर पोहोचले. मात्र, त्यानंतर सातत्याने सोन्याच्या किमती घसरत राहिल्यात.

23 एप्रिलला सोन्याची किंमत 3,000 रुपयांनी कमी झाली, या दिवशी सोन्याची किंमत 98 हजार 350 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी होती. 23 एप्रिल पासून ते 28 एप्रिल पर्यंत सोन्याच्या किमती सतत घसरतच राहिल्यात.

मात्र ही घसरण 29 एप्रिलला थांबली या दिवशी सोन्याची किंमत 97,970 रुपये एवढी होती. 30 एप्रिल ला या मौल्यवान धातूची किंमत 97 हजार 910 रुपये एवढी राहिली पुढे एक मे 2025 रोजी याची किंमत आणखी घसरली.

महाराष्ट्र दिनी सोन्याची किंमत 2180 रुपयांनी कमी झाली, एक मेला सोन्याची किंमत 95,730 रुपये प्रति दहा ग्राम एवढी नमूद करण्यात आली. दरम्यान, आजही सोन्याच्या किमतीत मोठी घसरण नमूद करण्यात आली आहे.

अशा परिस्थितीत आता आपण आज दोन मे 2025 रोजी सोन्याचा किमतीत किती घसरण झाली आहे आणि राज्यातील प्रमुख शहरांमध्ये 22 आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत काय आहे याचा आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

आज सोन्याची किंमत किती घसरली ?

मिळालेल्या माहितीनुसार, काल एक मे 2025 रोजी सोन्याची किंमत 2180 रुपयांनी कमी झाली. काल, 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति तोळा 2180 रुपयानी कमी होऊन 95 हजार 730 रुपयांपर्यंत खाली आली

आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति तोळा 2 हजार रुपयांनी कमी होऊन 87 हजार 750 रुपयांपर्यंत खाली आली. दरम्यान, आज 22 कॅरेट सोन्याची किंमत दोनशे रुपयांनी, 24 कॅरेट सोन्याची किंमत 220 रुपयांनी आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 160 रुपयांनी कमी झाली आहे.

राज्यातील प्रमुख शहरांमधील सोन्याच्या किमती 

मुंबई : 22 कॅरेट – 87 हजार 550 प्रति तोळा, 24 कॅरेट – 95 हजार 510, 18 कॅरेट – 71 हजार 640

पुणे : 22 कॅरेट – 87 हजार 550 प्रति तोळा, 24 कॅरेट – 95 हजार 510, 18 कॅरेट – 71 हजार 640

नागपूर : 22 कॅरेट – 87 हजार 550 प्रति तोळा, 24 कॅरेट – 95 हजार 510, 18 कॅरेट – 71 हजार 640

नाशिक : 22 कॅरेट – 87 हजार 580 प्रति तोळा, 24 कॅरेट – 95 हजार 540, 18 कॅरेट – 71 हजार 670

ठाणे : 22 कॅरेट – 87 हजार 550 प्रति तोळा, 24 कॅरेट – 95 हजार 510, 18 कॅरेट – 71 हजार 640

कोल्हापूर : 22 कॅरेट – 87 हजार 550 प्रति तोळा, 24 कॅरेट – 95 हजार 510, 18 कॅरेट – 71 हजार 640

जळगाव : 22 कॅरेट – 87 हजार 550 प्रति तोळा, 24 कॅरेट – 95 हजार 510, 18 कॅरेट – 71 हजार 640

लातूर : 22 कॅरेट – 87 हजार 580 प्रति तोळा, 24 कॅरेट – 95 हजार 540, 18 कॅरेट – 71 हजार 670

भिवंडी : 22 कॅरेट – 87 हजार 580 प्रति तोळा, 24 कॅरेट – 95 हजार 540, 18 कॅरेट – 71 हजार 670

वसई विरार : 22 कॅरेट – 87 हजार 580 प्रति तोळा, 24 कॅरेट – 95 हजार 540, 18 कॅरेट – 71 हजार 670

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News