सोन्याच्या किंमतीत पुन्हा मोठा बदल ! 29 जुलै 2025 रोजी 10 ग्रॅम सोन्याची किंमत किती आहे ?

सोन आणि चांदी खरेदीच्या तयारीत असणाऱ्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. सोन्याच्या आणि चांदीच्या किमतीत आज पुन्हा एकदा घसरण झाली आहे.

Published on -

Gold Rate Today : सोने – खरेदीच्या तयारीत आहात का मग तुमच्यासाठी आजची बातमी खास ठरणार आहे. खरे तर, गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीत सातत्याने चढ-उतार सुरू आहे. 23 जुलै 2025 रोजी शुद्ध सोन्याची किंमत एक लाख 2 हजार 330 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी होती. त्यानंतर मात्र या मौल्यवान धातूच्या किमतीत सातत्याने घसरण सुरू आहे.

24 जुलै पासून 26 जुलै पर्यंत या मौल्यवान धातूच्या किमतीत सतत घसरण पाहायला मिळाली. 27 आणि 28 तारखेला मात्र सोन्याच्या किमती स्थिर राहिल्यात पण आज पुन्हा एकदा सोन्याच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार आज 29 जुलै 2025 रोजी 18 कॅरेट 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याच्या किमतीत अनुक्रमे 80, 100 आणि 110 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी घसरण झाली आहे. दुसरीकडे आज सलग तिसऱ्या दिवशी चांदीची किंमत स्थिर राहिली आहे.

तीन दिवसांपूर्वी अर्थातच 26 तारखेला चांदीच्या किमती 2,000 रुपयांची घसरण झाली त्यानंतर मात्र किमती स्थिर आहेत. अशा परिस्थितीत आता आपण सोने आणि चांदीचे लेटेस्ट रेट कसे आहेत याचा आढावा घेऊयात. 

चांदीच्या लेटेस्ट किमती 

21 जुलै रोजी मात्र चांदीची किंमत एक लाख 16 हजार रुपये एवढी होती. मात्र 23 जुलै रोजी चांदीची किंमत एक लाख 19 हजार रुपये प्रति किलो अशी झाली. म्हणजे अवघ्या दोन दिवसांमध्ये चांदीच्या किमतीत तीन हजारांची वाढ झाली होती.

मात्र 23 तारखे नंतर पुन्हा एकदा या मौल्यवान धातूच्या किमतीत घसरण सुरू झाली. चांदीच्या किमतीत प्रति किलो मागे 24 तारखेला 1000 रुपयांची आणि 26 तारखेला दोन हजार रुपयांची घसरण झाली. म्हणून सध्या चांदीची किंमत एक लाख 16 हजार रुपये प्रति किलो अशी आहे. 

सोन्याचे लेटेस्ट रेट कसे आहेत

मिळालेल्या माहितीनुसार आज 29 जुलै 2025 रोजी राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, कोल्हापूर, जळगाव या शहरांमध्ये 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याच्या किमती अनुक्रमे 74,870 रुपये प्रति दहा ग्रॅम, 91 हजार पाचशे रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 99,820 रुपये प्रति दहा ग्रॅम अशा आहेत.

तसेच आज 30 जुलै 2025 रोजी राज्यातील नाशिक, लातूर, वसई विरार आणि भिवंडी या शहरांमध्ये 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याच्या किमती अनुक्रमे 74,900 रुपये प्रति दहा ग्रॅम, 91 हजार 530 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 99,850 रुपये प्रति दहा ग्रॅम अशा आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!