सोन्याच्या किंमतीत अचानक मोठा बदल! 13 जुलै 2025 रोजी 22 आणि 24 कॅरेट सोन्याच्या किमती कशा आहेत ?

सोन्यात गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी तसेच सर्वसामान्य ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आज सोन्याच्या दरवाढीला ब्रेक लागला आहे.

Published on -

Gold Rate : सोन खरेदी करण्याच्या तयारीत असणाऱ्या सर्वसामान्य ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरंतर गेल्या तीन दिवसांपासून सोन्याच्या किमतीत सतत मोठी वाढ होत होती. पण आज मात्र सोन्याच्या दरवाढीला ब्रेक लागला आहे.

10 जुलै 2025 रोजी 24 कॅरेट सुद्धा सोन्याची किंमत 220 रुपये आणि 22 कॅरेटची किंमत दोनशे रुपये परत ते 10 g ने वाढली होती. 11 जुलै रोजी 24 आणि 22 कॅरेट ची किंमत अनुक्रमे 600 रुपये आणि 550 रुपये प्रति दहा ग्रॅमने वाढली.

काल अर्थातच 12 जुलै 2025 रोजी 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत 710 रुपयांनी आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 650 रुपयांनी वाढली होती. दरम्यान आज 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचा किमतीत कोणताच बदल झालेला नाही. आज या मौल्यवान धातूच्या किमती स्थिर राहिल्या आहेत. 

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील 22 कॅरेट सोन्याचे रेट 

मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, कोल्हापूर, जळगाव या शहरांमध्ये आज 13 जुलै रोजी 22 कॅरेट सोन्याची किंमत 91400 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी आहे. तसेच नाशिक, लातूर, वसई विरार आणि भिवंडी या शहरांमध्ये आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 91 हजार 430 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी आहे. 

24 कॅरेट सोन्याचे रेट कसे आहेत?

राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, कोल्हापूर, जळगाव या शहरांमध्ये आज 13 जुलै 2025 रोजी 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत 99710 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी आहे. तसेच नाशिक, लातूर, वसई विरार आणि भिवंडी या शहरांमध्ये आज 24 कॅरेट सोन्याची किंमत 99 हजार 740 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी आहे.

18 कॅरेट सोन्याचे रेट कसे आहेत 

आज 13 जुलै 2025 रोजी राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, कोल्हापूर, जळगाव या प्रमुख शहरांमध्ये 18 कॅरेट सोन्याची किंमत 74,790 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी आहे. तसेच नाशिक, लातूर, वसई विरार आणि भिवंडी या शहरांमध्ये आज 24 कॅरेट सोन्याची किंमत 74 हजार 820 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!