Gold Rate Will Hike : सध्या भारतात लग्न सराईचा सिझन सुरू आहे. यामुळे कपडे, सोने-चांदीचे आभूषण खरेदी करण्यासाठी बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. मात्र लग्नसराईच्या सीजनमध्ये सोन्या-चांदीचे आभूषण खरेदी करणाऱ्यांना अधिकचा पैसा खर्च करावा लागतोय.
कारण की सोन्याचे भाव विक्रमी पातळीवर पोहोचले आहे. मात्र सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांना याचा मोठा फायदा होत आहे. ज्या लोकांनी आधीच सोन्यात गुंतवणूक केली आहे त्यांना आता यातून चांगले रिटर्न मिळत आहे.
लग्नसराईचा हंगाम पाहता आणि गेल्या एका महिन्यात सोन्याने चांगले रिटर्न दिले असल्याने आता सोने खरेदी करण्यासाठी सराफा बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार काल अर्थातच शुक्रवारी काल एक तोळा सोनं 70 हजार रुपयांवर पोहोचलं. यामध्ये जीएसटीचे चार्जेस समाविष्ट होते. बाजार विश्लेषकांनी दिलेल्या माहितीनुसार सोन्याच्या खरेदीचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे.
लग्नसराई, सणासुदीचा हंगाम आणि सोन्यातून मिळत असलेला जबरदस्त परतावा पाहता सोन्याची खरेदी आधीच्या तुलनेत थोडीशी वाढलेली पाहायला मिळते. याचा परिणाम म्हणून भावाला आधार मिळत आहे.
त्यामुळे सोन्याचे भाव काल जीएसटी सह 70 हजार रुपये प्रति दहा ग्रॅम वर पोहोचलेत. विशेष म्हणजे बाजार अभ्यासाकांनी आगामी काळात सोन्याचे भाव आणखी वाढणार असा अंदाज यावेळी व्यक्त केला आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की 28 मार्चला जीएसटी विना सोन्याचे भाव 66 हजार 300 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढे होते. मात्र काल अर्थातच 29 मार्चला सोन्याचे भाव जीएसटीसह 70 हजार 40 रुपये प्रति दहा ग्रॅमवर पोहोचलेत.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की 5 ते 29 मार्च या कालावधीतील सराफा बाजाराचं चित्र जर पाहिलं तर या 25 दिवसांत सोन्याच्या दरात सहा हजारांची, तर चांदीच्या दरात तीन हजारांची मोठी वाढ झाली आहे.
एका महिन्यात एवढा मोठा परतावा सोन्या-चांदीने दिल्याने गुंतवणूकदार सोने अन चांदी खरेदीकडे मोठ्या प्रमाणात वळू लागले आहेत.सध्याचा लग्नसराईचा हंगाम, पुढील महिन्यात येणारा गुढीपाडव्याचा सण, नंतर अक्षय तृतीया मग धनतेरस पाहता या कालावधीमध्ये सोने खरेदी आणखी वाढणार आहे.
परिणामी भावा आणखी कडाडण्याची शक्यता आहे. जाणकारांनी सांगितल्याप्रमाणे अक्षयतृतीयाला सोन्याच्या किमती काहीशा कमी होण्याची शक्यता आहे. परंतु धनतेरसला सोने विक्रमी 72 हजार रुपये प्रति दहा ग्रॅम पर्यंत पोहोचू शकते. त्यामुळे आता जाणकारांचा हा अंदाज खरा ठरतो का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.