अहमदनगर Live24 टीम, 01 डिसेंबर 2021 :- सलग दोन दिवसांच्या वाढीनंतर आज सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, डिसेंबरमधील डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव आज 0.02 टक्क्यांनी घसरला.
त्याचवेळी, चांदीचे भाव 0.14 टक्क्यांनी वाढून ट्रेड करत आहेत. जाणून घ्या काय आहे सोन्या-चांदीचा भाव सोन्याचा भाव आज 0.02 टक्क्यांनी घसरून 47795 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
दुसरीकडे आज चांदी 0.14 टक्क्यांनी वाढली.आज 1 किलो चांदीचा भाव 62,376 रुपये आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत MCX वर 10 ग्रॅम सोन्याची किंमत 56,200 रुपयांची होती.
आज ऑगस्ट फ्युचर्स MCXवर सोने 47,795 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर आहे, म्हणजेच ते अजूनही सुमारे 8400 रुपयांनी स्वस्त होत आहे. मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या दर सदर दर तुम्ही घरबसल्या सहजपणे जाणून घेऊ शकता.
यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल, त्यांनतर तुमच्या फोनवर एक संदेश येईल, ज्यामध्ये तुम्ही नवीनतम दर पाहू शकता. सोन्याची शुद्धता कशी तपासणार ?
तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल , तर यासाठी सरकारने एक अॅप बनवले आहे. ‘बीआयएस केअर अॅप’द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात.
या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धता तपासू शकत नाही, तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम