मुंबईत 9 लाखात स्वतःचे घर घेण्याची सुवर्णसंधी! वाचा कोणत्या ठिकाणी मिळेल सर्वात स्वस्त घर

Ajay Patil
Published:
mhada lottery

म्हाडा आणि सिडको या सरकारच्या महत्त्वाच्या गृहनिर्माण संस्था असून या संस्थांच्या माध्यमातून नागरिकांना परवडणाऱ्या दरांमध्ये घरे उपलब्ध करून दिली जातात. येणाऱ्या काही दिवसांमध्ये म्हाडाकडून पुणे तसेच औरंगाबाद इत्यादी शहरांमध्ये देखील सोडत काढण्यात येणार आहे.

त्यामुळे विविध उत्पन्न गटातील नागरिकांना स्वतःचे घर घेता येणे शक्य होणार आहे. अगदी याच पद्धतीने आता म्हाडाच्या कोकण मंडळाच्या माध्यमातून जवळपास पावणे पाच हजार घरांसाठी सोडत काढण्यात येणार आहे. त्यामुळे या सोडतीसंबंधी महत्त्वाची माहिती आपण या लेखात घेणार आहोत.

 म्हाडाच्या कोकण मंडळाकडून काढण्यात येणार घरांसाठी सोडत

याबाबत सविस्तर वृत्त असे की, म्हाडाच्या कोकण मंडळाच्या माध्यमातून सुमारे पावणे पाच हजार घरांकरिता 26 ऑक्टोबर ला सोडत काढण्यात येणार असून नागरिकांना परवडतील अशा दरांमध्ये घरे मिळण्याची सुवर्णसंधी चालून आलेली आहे. विशेष म्हणजे या सोडतीत सर्वसमावेशक योजनेतील 20% घरांचा देखील समावेश करण्यात आला आहे. यावर्षी 10 मे ला म्हाडाच्या कोकण मंडळाची सोडत पार पडली होती.

परंतु यामध्ये काही घरे विक्री झालेली नाहीत म्हणून हे विक्री न झालेल्या घरांचा देखील या सोडतीमध्ये समावेश करण्यात येणार आहे व त्यासोबतच विविध योजनांच्या माध्यमातून उपलब्ध घरे देखील समाविष्ट करण्यात येणार आहेत. या सोडतीसाठीचे वेळापत्रक  निश्चित करण्यात आले असून त्यानुसार 11 सप्टेंबर रोजी या लॉटरीची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे व याच दिवसापासून अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

या ठिकाणी जर विचार केला तर  साधारणपणे नऊ लाख 89 हजार ते 42 लाख रुपये किमतीचे घरे यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत. 20% योजनेतील 417 घरे हे पनवेल मधील गोदरेज प्रकल्पात असून त्यांचा देखील समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे डोंबिवली येथील रुणवाल प्रकल्पातील 621 घरांना या सोडतीमध्ये प्राधान्य देण्यात येणार आहे.

 घरांच्या क्षेत्रफळानुसार किती आहे किंमत?

या सोडतीअंतर्गत वेगवेगळ्या क्षेत्रफळाच्या घरांचा समावेश करण्यात आला असून यामध्ये 27.20 चौरस मीटर क्षेत्रफळ असलेल्या घराची किंमत 13 लाख 91 हजार रुपये आहे. 27.48 चौरस मीटर क्षेत्रफळ असलेल्या घराची किंमत  14 लाख 14 हजार सहाशे रुपये आहे. तसेच अल्प वर्गातील 408 घरांचा देखील यामध्ये समावेश आहे. घरांचे क्षेत्रफळ 43.74 ते 43.82 चौरस मीटर इतके आहे. याकरिता साधारणपणे 22 लाख 74 हजार 700, 22 लाख 82 हजार 100, 22 लाख 37 हजार 600 आणि 22 लाख 42 हजार रुपये अशा किमती असणार आहेत.

 या ठिकाणी आहेत सर्वाधिक स्वस्त घरे

या सोडतीमध्ये जे काही अत्यल्प गटातील घरे आहेत ते सर्वात स्वस्त असून ही घरे वसईतील मौजे गोखिवरे या ठिकाणी आहेत. या घरांची किंमत पाहिली तर ती नऊ लाख 89 हजार तीनशे रुपये इतके आहेत. या ठिकाणी सर्वात स्वस्त घर असले परंतु दोनच घरे या ठिकाणी सध्या उपलब्ध आहेत. तसेच मौजे वडवली येथे 203 घरे अत्यल्प गटातील असून यांची किंमत 19 लाख 47 हजार 700  ते 19 लाख 58 हजार इतकी आहे. या सोडतीमध्ये सर्वात महागडी घरे विरार बोळींज या ठिकाणी असून घरांची किंमत 41 लाख 81 हजार रुपये आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe