अहमदनगर Live24 टीम, 02 डिसेंबर 2021 :- Apple सध्या स्वस्त आयफोनची तयारी करत आहे. हा फोन iPhone SE नावाने बाजारात येणार आहे.
Apple iPhone SE 3 नावाचा स्वस्त फोन 2022 च्या दुसऱ्या तिमाहीत ग्राहकांच्या भेटीला येईल. विशेषबाब म्हणजे आगामी आयफोन 5G कनेक्टिव्हिटीसह मार्चमध्ये येईल, असं म्हटलं आहे.
Apple पुढीलवर्षी iPhone 14 लाईनअपमध्ये mini आयफोन सादर करणार नाही, त्याची जागा iPhone SE 3 घेईल,अशी माहिती काही रिपोर्ट्समधून मिळाली आहे.
हा निर्णय iPhone Mini च्या कमी लोकप्रियतेमुळे घेतला जाऊ शकतो. त्यामुळेच या नव्या आयफोनमध्ये कंपनी कमी किंमतीत चांगले स्पेक्स आणि फीचर्स देऊ शकते, अशी चर्चा आहे.
फीचर्स … iPhone SE 3 मध्ये 4.7-इंचाचा रेटिना HD डिस्प्ले दिला जाऊ शकतो. यात होम बटनमध्ये Touch ID देण्यात येईल.
अॅप्पलचा हा स्मार्टफोन लेटेस्ट A15 Bionic चिपसेटसह बाजारात येऊ शकतो.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम