Farmer Scheme : राज्यातील शेतकऱ्यांसाठी नववर्षाच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. खरंतर सध्या राज्यातील शेतकरी बांधव रब्बी हंगामासाठी लगबग करताना दिसतात. शेतकऱ्यांची शेतमाल विक्रीसाठीची लगबग देखील सुरूच आहे. सोयाबीन कापूस कांदा अशा शेतमालांची सध्या जोरदार विक्री सुरू आहे. अशातच आता उन्हाळी हंगामात भुईमूग पेरणी करू इच्छिणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की आपल्या देशात मोठ्या प्रमाणात खाद्यतेल आयात होते.
तेलबियांचे उत्पादन सातत्याने कमी होत असल्याने देशात खाद्यतेल आयातीचे प्रमाण गेल्या काही वर्षांमध्ये वाढले आहे. खरे तर तेलबिया पिकांना बाजारांमध्ये अपेक्षित भाव मिळत नसल्यानेच देशात तेलबिया पिकांची लागवड घटली आहे आणि यामुळे तेलबियांचे उत्पादन कमी होत आहे. मात्र आता देशातील तेलबिया उत्पादनात वाढ व्हावी यासाठी शासनाने काही निर्णय घेतलेले आहेत आणि याच निर्णयाच्या माध्यमातून आता केंद्र व राज्य शासनामार्फत राष्ट्रीय खाद्यतेल अभियान – तेलबिया राबविण्यात येत आहे.

या अभियानांतर्गत उन्हाळी हंगामासाठी भुईमूग पिकासाठी 100 टक्के अनुदानावर प्रमाणित बियाणे वितरण आणि पीक प्रात्यक्षिके राबविण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती कृषी विभागातील अधिकाऱ्यांकडून समोर आली आहे. दरम्यान या अभियानासाठी पात्र शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत उन्हाळी भुईमूग पिकासाठी कादरी लेपाक्षी (K-1812) या वाणाचे हेक्टरी 150 किलो प्रमाणित बियाणे वितरित करण्यात येणार आहे. या बियाण्याचा दर प्रतिकिलो 114 रुपये आहे.
मात्र शेतकऱ्यांना येत्या उन्हाळी हंगामात भुईमूग पेरणीसाठी हे बियाणे 100 टक्के अनुदानावर उपलब्ध होणार आहे. प्रति लाभार्थी किमान 0.20 हेक्टर आणि कमाल 1 हेक्टर क्षेत्रासाठी लाभ देण्यात येईल. म्हणजेच या योजनेच्या माध्यमातून एका शेतकऱ्याला जास्तीत जास्त 150 किलो प्रमाणेच बियाणे या योजनेच्या माध्यमातून वितरित करण्यात येणार आहे. हे भुईमूग बियाणे 100% अनुदानावर उपलब्ध होणार आहे म्हणजेच एकही रुपया खर्च न करता शेतकऱ्यांना हे बियाणे उपलब्ध होईल आणि नक्कीच या निर्णयाचा भुईमूग उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. या अंतर्गत शेतकऱ्यांना बियाण्याची 20kg ची किंवा 30 किलो ची बॅग मिळणार आहे. दरम्यान क्षेत्रानुसार हे बियाणे वितरित करण्यात येणार असल्याने जर एखाद्या शेतकऱ्याचे क्षेत्र कमी असेल आणि बॅगेची पॅकिंग साईज अधिक असेल तर वरील बियाण्यासाठी शेतकऱ्यांना मात्र पैसे द्यावे लागणार आहेत.
तसेच, या योजनेच्या माध्यमातून भुईमूग उत्पादक शेतकऱ्यांना उन्हाळी भुईमूग पीक प्रात्यक्षिक (वाण – गिरनार-4) अंतर्गत हेक्टरी 100 किलो शेंगा प्रमाणित बियाणे 100 टक्के अनुदानावर देण्यात येणार आहे. ही प्रात्यक्षिके शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या तसेच कृषी क्षेत्रात कार्यरत सहकारी संस्थांमार्फत राबविण्यात येणार आहे. यासाठी सुद्धा प्रति लाभार्थी किमान 0.40 हेक्टर क्षेत्राची अट ठेवण्यात आली आहे. आता आपण योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास अर्ज कुठे करावा लागणार याबाबत थोडक्यात माहिती पाहूयात.
अर्ज कुठे करावा लागेल
योजनेच्या लाभासाठी शेतकऱ्यांना कृषी विभागाकडे धाव घ्यावी लागणार आहे. तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे ऑफलाइन पद्धतीने योजनेच्या लाभासाठी अर्ज सादर करावेत असे आवाहन संबंधितांच्या माध्यमातून करण्यात आले आहे. भुईमूग बियाण्याचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलवर ‘प्रमाणित बियाणे वितरण, प्रात्यक्षिके, फ्लेक्झी घटक, कीटकनाशके आणि खते’ या घटकांतर्गत अर्ज करता येणार आहे. मात्र यासाठी शेतकऱ्यांची अॅग्रीस्टॅकवर नोंदणी असणे बंधनकारक आहे. म्हणजेच शेतकऱ्यांकडे योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास फार्मर आयडी असणे अनिवार्य आहे. खरे तर आता जवळपास प्रत्येक शेतकरी योजनेसाठी फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आले आहे. पीएम किसान योजनेच्या लाभासाठी सुद्धा फार्मर आयडी अनिवार्य करण्याचा निर्णय शासन आणि घेतलेला आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अजून युनिक फार्मर आयडी बनवलेला नसेल त्यांनी लवकरात लवकर हे काम पूर्ण करून घेणे त्यांच्यासाठी फायद्याचे ठरणार आहे.













