मुंबई आणि पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ शहरासाठी सुरू होणार नवीन Express Train, कसं असणार वेळापत्रक?

उन्हाळी सुट्ट्यांमध्ये मुंबई ते नांदेड दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून उन्हाळी सुट्ट्यांमध्ये होणारी अतिरिक्त गर्दी पाहता मुंबई ते नांदेड दरम्यान विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेण्यात आला असून या निर्णयामुळे मराठवाड्यातील जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे.

Published on -

Maharashtra Railway News : मुंबई आणि पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. खरे तर पुढल्या महिन्यापासून रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढणार आहे. उन्हाळी सुट्ट्यांमध्ये दरवर्षी रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढते आणि यामुळे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागतो.

उन्हाळी सुट्ट्या लागल्यात की अनेक जण आपल्या नातलगांकडे जाण्याचा प्लॅन बनवतात तर काहीजण पिकनिकचा प्लॅन आखतात. यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढते पण अनेकांना तिकीट मिळत नाही.

हीच गोष्ट विचारात घेऊन मुंबई ते नांदेड दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळावा या अनुषंगाने स्पेशल ट्रेन चालवण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई येथील लोकमान्य टिळक टर्मिनस ते मराठवाड्यातील नांदेड दरम्यान समर स्पेशल ट्रेन चालवली जाणार असून आज आपण याच समर स्पेशल ट्रेन चे संपूर्ण वेळापत्रक आणि ही गाडी राज्यातील कोणकोणत्या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार याबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

मुंबई नांदेड समर स्पेशल ट्रेन चे संपूर्ण वेळापत्रक

लोकमान्य टिळक टर्मिनस – हुजूर साहेब नांदेड समर स्पेशल ट्रेन (गाडी क्रमांक 01105) 9 एप्रिल 2025 ते 25 जून 2025 या कालावधीत चालवली जाणार आहे. या कालावधीत ही गाडी दर बुधवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 00.55 वाजता रवाना होणार आहे आणि नांदेड येथे त्याच दिवशी 19.00 वाजता पोहोचणार आहे.

तसेच हुजूर साहेब नांदेड-लोकमान्य टिळक टर्मिनस समर स्पेशल ट्रेन (ट्रेन क्रमांक 01106) 9 एप्रिल ते 25 जून 2025 या कालावधीत नांदेड येथील हुजूर साहेब नांदेड रेल्वे स्थानकावरून सोडली जाणार आहे.

या कालावधीत ही गाडी दर बुधवारी नांदेड येथून 20.00 वाजता सोडली जाणार आहे आणि दुसऱ्या दिवशी 14.45 वाजता ही गाडी राजधानी मुंबईत पोहोचणार आहे. या गाडीमुळे मराठवाड्यातील जनतेला जलद गतीने राजधानीत पोहोचता येणे शक्य होईल.

मराठवाड्यातील नांदेड ते मुंबई दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या गाडीचा मोठा दिलासा मिळणार आहे. या गाडीसाठीच्या तिकीट बुकिंग बाबत बोलायचं झालं तर गेल्या चार दिवसांपासून या गाडीचे तिकीट बुकिंग सुरू आहे.

25 मार्च 2025 पासून या गाडीचे तिकीट बुकिंग सुरू असून www.irctc.co.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रवाशांना तिकीट बुक करता येणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!