पुणेकरांसाठी गुड न्यूज ! पुण्यातून ‘या’ शहरासाठी सुरू झाली स्पेशल पर्यटन बस सेवा, कोण-कोणत्या स्पॉटवर थांबणार ?

पुणे शहरातील पर्यटकांसाठी पीएमपीएमएल कडून विशेष बस सेवा सुरू करण्यात आली आहे. स्वारगेट आगारातून ही बस सेवा सुरू होणार आहे. आज आपण याच नव्या बससेवेची माहिती पाहणार आहोत.

Published on -

Pune News : पुणे शहरातील नागरिकांसाठी आणि पर्यटकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड कडून एक विशेष पर्यटन बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही बस सेवा पुणे ते लोणावळा दरम्यान चालवली जाणार आहे. खरे तर लोणावळा हे महाराष्ट्रातील एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे.

या ठिकाणी मुंबई आणि पुण्यातील अनेक पर्यटक भेटी देत असतात. विकेंडला पुण्यातून अगदीच हाकेच्या अंतरावर असणाऱ्या लोणावळ्यात पर्यटकांची तुंबळ गर्दी पाहायला मिळते आणि म्हणूनच पीएमपीएलकडून पुणे ते लोणावळा दरम्यान विशेष पर्यटन बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून या बससेवेमुळे लोणावळ्याला पिकनिक साठी जाणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

कसा असणार पुणे – लोणावळा बससेवेचा रूट

पीएमपीएमएलने रूट नंबर 11 वर ही विशेष बस सेवा सुरू केली आहे. म्हणजेच ही बस स्वारगेट स्थानकावरून सोडली जाणार आणि लोणावळ्यापर्यंत धावणार आहे. या मार्गावर पीएमपीएमएलकडून इलेक्ट्रिक बस चालवली जाणार असून यामुळे प्रवाशांना अगदीच जलद आणि सुरक्षित प्रवासाचा अनुभव घेता येईल. पीएमपीएमएलच्या अध्यक्षा आणि व्यवस्थापकीय संचालक दीपा मुधोळ-मुंडे यांनी या नव्या बससेवेला नुकताच हिरवा झेंडा दाखवला आहे.

कोणकोणत्या स्पॉटवर थांबणार विशेष बस?

स्वारगेट – लोणावळा विशेष पर्यटन बस स्वारगेट बस स्थानकातून सुटल्यानंतर डेक्कन जिमखाना, एकवीरा देवी मंदिर आणि कार्ला गुफा या ठिकाणी थांबा घेईल अशी सुद्धा माहिती देण्यात आली आहे. ही बस लोणावळा बसस्थानकातून त्याच दिवशी स्वारगेटकडे रवाना होणार आहे. म्हणजेच वन डे ट्रिप साठी देखील ही बस सेवा उपयुक्त ठरेल अशी आशा आहे. या बसने स्वारगेट वरून लोणावळ्याला जाण्यासाठी पाचशे रुपये प्रति व्यक्ती इतके तिकीट लागणार आहे. शहरातील प्रमुख पीएमपीएमएलच्या पास सेंटरवर जाऊन या बससाठी तिकीट बुक करता येणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!