मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी ! जुलैच्या हप्त्याची संभाव्य तारीख जाहीर

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. जुलै महिन्याच्या हप्त्याची संभाव्य तारीख समोर आली आहे.

Published on -

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही गेल्या शिंदे सरकारने सुरू केलेली महाराष्ट्र राज्य शासनाची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या अंतर्गत 21 ते 65 वर्षे वयोगटातील राज्यातील पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत. आतापर्यंत या योजनेच्या लाभार्थी महिलांना एकूण 12 हप्ते मिळाले आहेत आणि लवकरच 13 वा हप्ता देखील दिला जाणार आहे.

खरे तर ही योजना सुरू होऊन आता जवळपास बारा महिने पूर्ण झाले आहेत आणि या योजनेच्या मदतीमुळे गरीब लाभार्थी महिलांना मोठा दिलासा मिळतोय. मात्र, अलीकडील काही महिन्यांमध्ये लाडकी बहिण योजनेतुन लाखो महिलांना वगळण्यात आले आहे. निकषांची पूर्तता न झाल्यामुळे महिलांना या योजनेतून बाद केले जात आहे. दरम्यान, आता याच योजनेच्या संदर्भात एक नव अपडेट समोर आल आहे.

काय आहे नवीन अपडेट ?

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना आत्तापर्यंत जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 2024 आणि जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून 2025 या काळातील एकूण बारा महिन्यांचा लाभ देण्यात आला आहे.

जुलै 2024 पासून ते जून 2025 पर्यंत एकूण 12 हप्ते पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले असून या योजनेचा बारावा हप्ता जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पात्र महिलांच्या खात्यात जमा झाला आहे. यामुळे आता जुलै महिन्याचा हप्ता कधी मिळणार ? जुलै महिन्याचा हप्ता पुढील महिन्यात जमा होणार का ? असे काही प्रश्न लाडक्या बहिणीकडून उपस्थित होत आहेत. दुसरीकडे मीडिया रिपोर्ट्स मध्ये जुलै महिन्याचा हप्ता जुलैमध्येचं मिळू शकतो असा दावा केला जातोय.

खरे तर जुलै महिना संपायला आता अवघे नऊ दिवस उरले आहेत आणि अजून जुलै महिन्याच्या हफ्त्यासंदर्भात फडणवीस सरकारकडून कोणताचं निर्णय झालेला नाही. पण जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जुलैचा लाभ लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. म्हणजे महिना संपण्याआधीच लाडक्या बहिणींना जुलैचे पैसे दिले जातील आणि यामुळे त्यांना नक्कीच मोठा दिलासा मिळणार आहे.

या महिलांना लाभ मिळणार नाही

लाडकी बहीण योजनेचा लाभ फक्त 21 वर्ष किंवा त्याहून अधिक आणि 65 वर्ष किंवा त्याहून कमी वय असणाऱ्या महिलांना दिला जाणार आहे. म्हणजे 21 पेक्षा कमी आणि 65 पेक्षा जास्त वय असणाऱ्यांना याचा लाभ मिळणार नाही. नियमानुसार ज्या कुटुंबाच वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त आहे अशा कुटुंबातील महिलांना याचा लाभ मिळणार नाही.

कुटुंबात कोणी सरकारी नोकरीला असेल तर अशा कुटुंबातील महिलांना याचा लाभ मिळणार नाही. कुटुंबातील एखादा सदस्य आयकर भरत असेल तर अशा कुटुंबातील महिलांना याचा लाभ मिळणार नाही. कुटुंबात जर आधीपासूनच दोन महिला या योजनेचा लाभ घेत असेल तर अशा कुटुंबातील इतर महिलांना याचा लाभ घेता येणार नाही.

संजय गांधी निराधार योजनेसारख्या आर्थिक लाभाच्या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना याचा लाभ मिळणार नाही. घरात जर चार चाकी वाहन असेल तर अशा कुटुंबातील महिलांना याचा लाभ मिळणार नाही. महाराष्ट्र बाहेरील महिलांना याचा लाभ मिळणार नाही. आजी – माजी आमदार, खासदार असणाऱ्या कुटुंबातील महिलांना याचा लाभ मिळणार नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!