अहमदनगर Live24 टीम, 8 ऑगस्ट 2021 :- गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीची किंमत कमी होत आहे. यामुळे ते फक्त 5 दिवसांत 450 रुपयांनी स्वस्त झाले.
मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये शुक्रवारी 06 ऑगस्ट रोजी सोन्याचे दर 0.26 टक्क्यांनी कमी झाले. सोमवारी सोन्याच्या दराबद्दल बोलायचे झाल्यास या दिवशी सोने 0.16 टक्क्यांनी घसरून 47926 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले होते.
सोमवारी सोन्याचा दर 47926 रुपये प्रति 10 ग्रॅम होता, जो काल 0.26 टक्क्यांनी घसरून 47,480 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. म्हणजेच अवघ्या 5 दिवसांत सोन्याची किंमत 450 रुपयांपर्यंत कमी झाली. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) शनिवारी आठवड्याच्या शेवटच्या दिवशी बंद आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा कोणत्या दराने व्यापार होत आहे ते जाणून घ्या :- आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा व्यापार घसरणीसह सुरु आहे. अमेरिकेतील सोन्याचा व्यापार 39.90 डॉलर घसरणीसह 1,763.69 डॉलर प्रति औंस रेट वर ट्रेड होत आहे. दुसरीकडे, चांदी 0.81 डॉलरच्या घसरणीसह 24.34 डॉलरवर ट्रेड होत आहे.
जाणून घ्या मोठ्या शहरातील दर :-
दिल्ली :- 22ct सोने: रु. 45750, 24ct सोने: रु. 49900, चांदी किंमत: रु. 65000
मुंबई :- 22ct सोने: रु. 45700, 24ct सोने: रु. 46700, चांदी किंमत: रु. 65000
नाशिक :- 22ct सोने: रु. 44900, 24ct सोने: रु. 48150, चांदी किंमत: रु. 65000
पुणे :- 22ct सोने: रु. 44900, 24ct सोने: रु. 48150, चांदी किंमत: रु. 65000
अहमदनगर :- 22 कॅरेट सोने: रु. 45780 , 24 कॅरेट सोने: रु.48070 , चांदी किंमत: रु. 71700
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम