आनंदाची बातमी! व्हिसा नसेल तरी फिरता येणार ‘या’ 58 देशांत; काय आहे फ्री व्हिजा स्किम? वाचा, देशांची यादी

Published on -

प्रवास करायला सर्वांनाच आवडते. परदेश प्रवासासाठी दोन कागदपत्रे अत्यंत महत्त्वाची असतात, ती म्हणजे पासपोर्ट आणि व्हिसा. पासपोर्ट आपल्या देशात बनवला जातो पण व्हिसा आपल्याला जिथे जायचे आहे त्या देशाने बनवला जातो. अनेकदा व्हिसा नसल्यामुळे अडचणींना सामोरे जावे लागते. पण तुम्हाला माहिती आहे का की आता असे ५८ देश आहेत जिथे तुम्ही व्हिसाशिवायही प्रवास करू शकता.

काय आहे सुविधा?

प्रत्येक देशाचं पासपोर्टचं एक आंतरराष्ट्रीय रँकिंग असतं. दरवर्षी या रँकींगमध्ये बदल होत असतात. त्यानुसार त्या देशातील नागरिकांना कोणत्या देशात व्हिसाशिवाय प्रवास करता येईल, हे ठरतं. नुकत्याच जाहीर झालेल्या हेलने पासपोर्ट इंडेक्सनुसार भारताचं रँकिंग 80 वरुन 81 पर्यंत घसरलं आहे. त्यामुळे भारतीयांना व्हिसाशिवाय प्रवास करता येणाऱ्या देशांच्या यादीतही बदल झाला. त्यामुळे आता भारतीयांना जगभरातील तब्बल 58 देशांत व्हिसाशिवाय जाता येणार आहे.

व्हिसामुक्तीत सुंदर देशांचा समावेश

भारतातील नागरिकांना युरोपियन देश, अमेरिका किंवा युनायटेड किंग्डम सारख्या देशांसाठी व्हिसा घेणे आवश्यक आहे. तथापि, आता असे ५८ देश आहेत जिथे भारतीय कोणत्याही व्हिसाशिवाय जाऊ शकतात, जिथे तुम्हाला आगमनानंतर व्हिसा देण्याची सुविधा मिळते. या यादीमध्ये इंडोनेशिया आणि मॉरिशस सारख्या अतिशय सुंदर देशांचा समावेश आहे.

व्हिसा फ्री 58 देशांची यादी

भारतीयांसाठी व्हिसा-मुक्त देशांमध्ये अंगोला, बार्बाडोस, भूतान, बोलिव्हिया, ब्रिटिश व्हर्जिन बेटे, बुरुंडी, कंबोडिया, केप व्हर्डे बेटे, कोमोरो बेटे, कुक बेटे, गिनी-बिसाऊ, हैती, इंडोनेशिया, इराण, जमैका, जॉर्डन, कझाकस्तान, केनिया, किरिबाती, लाओस, मकाऊ, मादागास्कर, मलेशिया, मालदीव, मार्शल बेटे, मॉरिशस, मायक्रोनेशिया, मंगोलिया, मोझांबिक, म्यानमार, नामिबिया, नेपाळ, नियू, पलाऊ बेटे, कतार, रवांडा, सामोआ, सेनेगल, सेशेल्स, सिएरा लिओन, सोमालिया, श्रीलंका, सेंट किट्स आणि नेव्हिस, सेंट लुसिया, सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडाइन्स, टांझानिया, थायलंड, तिमोर-लेस्टे, त्रिनिदाद आणि टोबॅगो, तुवालु, वानुआतु, झिम्बाब्वे यांचा समावेश आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe