Goverenment Employee News : दीपोत्सवाला आता अवघ्या काही दिवसांचा काळ बाकी राहिला आहे. लवकरच दिवाळीचा आनंददायी सण साजरा होणार आहे. दरम्यान याच दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील काही कर्मचाऱ्यांना एक मोठी भेट देण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्यातील पुणे महापालिके अंतर्गत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर दिवाळी बोनस देण्याचा मोठा निर्णय महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून घेण्यात आला आहे.
दोन आठवड्यांपूर्वीच याबाबतचा निर्णय घेण्यात आला असून ऑक्टोबर महिन्याचा पगार सोबत हा दिवाळी बोनस संबंधित कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे या सदर नोकरदार मंडळीची यंदाची दिवाळी गोड होणार आहे.
किती बोनस मिळणार
पुणे महापालिका अंतर्गत कार्यरत असणाऱ्या 18000 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना 8.33% बोनस आणि 23 हजार रुपये एवढे सानुग्रह अनुदान देण्याचा मोठा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. विशेष बाब अशी की ही रक्कम दिवाळीच्या आधीच संबंधित पात्र कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.
यामुळे या लोकांचा यंदाचा दीपोत्सव हा मोठ्या थाटामाटात साजरा होईल अशी आशा आहे. पुणे महापालिकेच्या लेखा वित्त विभागाने याबाबतचे परिपत्रक दोन आठवड्या पूर्वीच निर्गमित केले होते.
यासाठी पुणे महापालिका प्रशासनाने अर्थसंकल्पात 125 कोटी रुपयांची तरतूद केली होती. यानुसार आता हा दिवाळी बोनस आणि सानूग्रह अनुदान जाहीर करण्यात आले असून याचा लाभ आता लवकरच या कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.
मात्र याचा लाभ फक्त अशाच कर्मचाऱ्यांना मिळणार आहे ज्यांनी गेल्या वर्षभरात किमान 180 दिवस उपस्थिती नोंदवलेली आहे. म्हणजे गेल्या वर्षभरात 180 दिवस हजर असणाऱ्या कर्मचाऱ्यांनाचं याचा लाभ दिला जाणारा आहे.