Government Employee DA : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी धक्कादायक बातमी समोर येत आहे. वास्तविक गेल्या काही वर्षांपासून शासकीय कर्मचाऱ्यांना आपल्या प्रलंबित मागण्यासाठी आंदोलनाच हत्यार उपसाव लागत आहे. दरम्यान ओ पी एस म्हणजे जुनी पेन्शन योजनेच्या मागणीसाठी संपूर्ण देशभर कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून आंदोलने केली जात आहेत.
महाराष्ट्रात देखील कालपासून OPS या प्रमुख मागणीसाठी 17 लाख कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपाला सुरुवात झाली आहे. दरम्यान आता केंद्र शासनाने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा संदर्भात एक मोठा निर्णय घेतला आहे. कोविड कालावधीतील 18 महिन्यातील महागाई भत्ता थकबाकी केंद्र शासनाने देण्यास नकार दिला आहे.

हे पण वाचा :- शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! जुनी पेन्शन योजनेसंदर्भात ‘हा’ महत्त्वाचा शासन निर्णय जारी, GR पहा
केंद्रीय वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार, कोरोना महामारीच्या कालावधीमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचा 18 महिन्यांचा महागाई भत्ता हा थकलेला आहे. पण हा थकित महागाई भत्ता केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि निवृत्त कर्मचाऱ्यांना दिला जाणार नाही. यामुळे कर्मचाऱ्यांच्या थकीत महागाई भत्ता मिळण्याच्या सर्व आशा आता धुळीस मिळताना पहावयास मिळत आहे.
याबाबत पंकज चौधरी यांनी सभागृहाला माहिती देताना सांगितले की, कोरोना महामारीच्या काळात शासनाच्या माध्यमातून विविध कल्याणकारी योजना राबविण्यात आल्यात. अशा परिस्थितीत शासनाला मोठा खर्च त्या कालावधीत करावा लागला. योजनांसाठी कोट्यावधी रुपयांची तरतूद करण्यात आली.
हे पण वाचा :- नादखुळा ! 72 वर्षीय तरुण शेतकऱ्याचा शेतीत भन्नाट प्रयोग; ‘या’ पिकाच्या शेतीतून एका एकरात मिळवले 3 लाखाचे उत्पन्न
याचा परिणाम म्हणून 2020-21 आणि त्यानंतर देखील शासन तिजोरीवर मोठा बोजा राहिला अशा परिस्थितीत सरकारी कर्मचाऱ्यांना त्या कालावधीमधील महागाई भत्ता थकबाकी देणे उचित नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. एकंदरीत 18 महिने कालावधीतील महागाई भत्ता संदर्भात केंद्र शासनाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
शासनाकडून कोविड काळातील थकीत महागाई भत्ता कर्मचाऱ्यांना मिळणार नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे, यामुळे मात्र केंद्रीय कर्मचाऱ्यांमध्ये शासनाविरोधात रोष पाहावयास मिळत आहे. निश्चितच शासनाने कोविड काळातील महागाई भत्ता संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली असल्याने आता कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून यावर काय प्रतिक्रिया दिली जाते किंवा काय भूमिका मांडली जाते याकडे विशेष लक्ष राहणार आहे.
हे पण वाचा :- सोलापूरच्या शेतकरी पुत्राचा शाही थाट! लग्नाची वरात काढली थेट हत्तीवरून; अख्या जिल्ह्यात रंगली शाही वरातीची चर्चा