Government Employee News : महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. विविध विभागात कार्यरत असणाऱ्या राज्य शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी शासनाकडून तीन महत्त्वाचे शासन निर्णय जारी झाले आहेत.
गेल्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सरकारने हे तीन महत्त्वाचे निर्णय जाहीर केले असून आज आपण हे निर्णय नेमके काय आहेत आणि याचा सरकारी कर्मचाऱ्यांवर काय परिणाम होणार याबाबतची डिटेल माहिती या लेखातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 28 ऑक्टोबर 2025 रोजी विविध विभागाकडून तीन महत्त्वपूर्ण शासन निर्णय जारी करण्यात आले आहेत.

हे आहेत ऑक्टोबर महिन्यात जारी झालेले महत्त्वाचे शासन निर्णय
जलसंपदा विभागाचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय – ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाने एक महत्त्वाचा शासन निर्णय जारी केला.
विभागाच्या या महत्त्वपूर्ण निर्णय या निर्णयाअंतर्गत दिवंगत कर्मचाऱ्यांच्या वारसांना ठेव संलग्न विमा योजना अंतर्गत अनुज्ञेय असलेली रक्कम अदा करण्यास मंजूरी देण्यात आली. या निर्णयामुळे मयत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना मोठा दिलासा मिळणार अशी आशा आहे.
सामान्य प्रशासन विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय – जनगणना 2027 ला चालना मिळाली आहे. सामान्य प्रशासन विभागाने 27 ऑक्टोबर 2025 रोजी जारी केलेल्या शासन निर्णयाअन्वये जनगणना 2027 च्या पुर्व चाचणीकरीता प्रधान जनगणना अधिकारी , चार्ज अधिकारी , अन्य अधिकारी , प्रगणक , पर्यवेक्षक व जनगणना लिपिक म्हणून नियुक्ती करण्यास मंजुरी प्रदान केली आहे.
विशेष शिक्षकांना मिळणार थकित वेतन – महाराष्ट्र राज्य शासनाच्या अंतर्गत येणाऱ्या अपंग समावेशित शिक्षण योजना ( माध्यमिक स्तर ) अंतर्गत विशेष शिक्षक यांचे थकीत वेतन अदा करणेबाबत महत्त्वाचा जीआर जारी करण्यात आला आहे.
गेल्या महिन्यात निघालेल्या या शासन निर्णयानुसार या संबंधित शिक्षकांचे थकीत वेतन अदा करण्यासाठी 1,46,22,381 रुपये वितरित करण्यास मंजुरी मिळाली आहे. यामुळे संबंधित शिक्षकांचे थकीत वेतन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.













