शासकीय सेवेत 10 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक सेवा दिलेल्या कर्मचाऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय ! जीआर पण निघाला….
Government Employee News : सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी शासनाच्या माध्यमातून एक महत्त्वाचा निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून 26 डिसेंबर 2025 रोजी विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण जीआर जारी करण्यात आला आहे.

आज GR 10 वर्षे व त्यापेक्षा अधिक सेवा पूर्ण झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा आहे. या जीआर अंतर्गत दहा वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक सेवा पूर्ण झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करणे बाबत असून आज आपण याच जीआरची सविस्तर माहिती या लेखातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत समावेशन करण्याबाबत मार्च 2024 मध्ये निघालेल्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांपैकी दहा वर्षे व त्यापेक्षा जास्त सेवा झालेल्या वाहन चालकांच्या सेवा सार्वजनिक आरोग्य विभागातील मंजूर आकृतीबंधातील नियमित वाहनचालक या पदावर समायोजन आणि नियमित करण्याबाबत शासन आदेश जारी करण्यात आला आहे.
तसेच यासंदर्भातील डिसेंबर 2024 मध्ये जारी झालेल्या शासन आदेशातील परिच्छेद क्रमांक पाच मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. या सुधारणेनुसार राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राज्यातील कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांपैकी दहा वर्षे व त्यापेक्षा जास्त सेवा झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे सेवा समावेशन केल्यानंतर त्यांचे वेतन त्यांच्या लगतच्या मागील महिन्यांमध्ये प्राप्त होणाऱ्या मानधनां एवढ्या नियमित वेतनश्रेणीतील पुढील टप्प्यावर निश्चित करण्यास मान्यता देण्यात येत आहे.
सदर वेतन निश्चितीला संबंधित कार्यालय प्रमुखांना मान्यता द्यावी लागणार आहे. तसेच या शासन निर्णयानुसार 18 सप्टेंबर 2025 रोजी जारी झालेला शासन आदेशातील परिषद क्रमांक दोन मधील दिलेले आदेश रद्द करण्यात येत आहेत.
नक्कीच, शासनाच्या या निर्णयामुळे संबंधित विभागातील कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत नियमित करण्यात येणार असल्याने संबंधितांच्या माध्यमातून शासनाच्या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे. दरम्यान शासनाचा हा शासन आदेश महाराष्ट्र राज्य शासनाच्या Www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे.