Government Employee News : महाराष्ट्र राज्य शासनाने नुकताच एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भातला आहे. सरकारी कामकाजात शिस्त वाढावे आणि पारदर्शकता यावी यासाठी राज्य सरकारकडून सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचे निर्देश जारी करण्यात आले आहे.
या नव्या निर्देशानुसार आता सरकारी कर्मचाऱ्यांनी एक छोटीशी चूक केली तरी देखील त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होणार आहे.

नव्या निर्णयामुळे राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सर्वच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आता कार्यालयात जाताना अधिक दक्ष राहावे लागणार आहे.
राज्यातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आता कार्यालयात जाताना आपले ओळखपत्र स्पष्टपणे दिसेल अशा पद्धतीने गळ्यात घालावे लागणार आहे.
जर सरकारी कर्मचाऱ्यांचे अथवा अधिकाऱ्यांचे ओळखपत्र स्पष्टपणे दिसले नाही तर त्यांच्यावर थेट शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते. जे लोक शासकीय कार्यालयात प्रशासकीय कामांसाठी जातात त्यांच्या सोयीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
सर्वसामान्य नागरिकांना सरकारी कर्मचाऱ्यांची ओळख लगेच पटावी, त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी सरकारने हा नवा निर्णय घेतलेला आहे.
यासंदर्भात काल 10 सप्टेंबर 2025 रोजी राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून महत्त्वाचे परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या या महत्त्वपूर्ण परिपत्रकात या संदर्भात सविस्तर माहिती देण्यात आलीये.
खरे तर राज्य कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना याआधी सुद्धा याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. पण या सूचनांचे कर्मचाऱ्यांकडून व्यवस्थित पालन होत नाहीये.
यामुळे आता सामान्य प्रशासन विभागाने शासकीय परिपत्रक जारी करत कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा सूचना दिल्या आहेत आणि पालन न करणाऱ्यांवर कारवाई होईल असा इशारा दिला आहे.
त्यामुळे बेसिस्त आणि बेजबाबदार वागणाऱ्या कर्मचाऱ्यांवर लगाम घालता येणे शक्य होणार असल्याचा विश्वास जाणकारांकडून व्यक्त होतोय. या नियमांचे पालन होत आहे की नाही याची काळजी घेण्याचे काम विभागप्रमुख आणि कार्यालय प्रमुखांवर राहणार आहे.