केंद्राच्या तसेच राज्याच्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शन धारकांसाठी महत्वाची बातमी ! मिळणार ‘हा’ आर्थिक लाभ 

Published on -

Government Employee News : केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी तसेच महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शन धारकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. खरे तर सध्या सगळीकडे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अगदीच उत्साहाचे वातावरण आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना शासनाच्या माध्यमातून दिवाळीच्या निमित्ताने बोनसची सुद्धा भेट मिळाली आहे.

तसेच गेल्या काही दिवसांपूर्वी केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचाही लाभ मिळाला होता. महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शन धारकांना सुद्धा येत्या काही दिवसांनी महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणार आहे.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धरतीवर 58% होणार आहे अर्थात महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढेल आणि ही वाढ एक जुलैपासून प्रभावी राहील. दुसरीकडे सरकारी कर्मचारी आठव्या वेतन आयोगाची देखील आतुरतेने वाट पाहत आहेत.

केंद्रीय कर्मचारी असोत किंवा राज्य कर्मचारी सगळे आठव्या वेतन आयोगाबाबत मोठ्या प्रमाणात उत्सुक आहेत. जानेवारी महिन्यात नव्या आठव्या वेतन आयोगाची घोषणा झाली आहे परंतु अजून आठव्या वेतन आयोगाच्या समितीची स्थापना झालेली नाही तसेच या संदर्भातील कोणतीच कारवाई सुरू करण्यात आलेली नाही यामुळे कर्मचारी थोडेसे चिंतेत सुद्धा आहेत.

मात्र नव्या वेतन आयोगात कोणकोणते बदल होतील कर्मचाऱ्यांना कोणते फायदे होतील यासंदर्भात अनेक चर्चा सुरू आहेत. अशातच आता नव्या वेतन आयोगाबाबत एक महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे जे की आज आपण या लेखातून समजून घेणार आहोत. 

 आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशी एक जानेवारी 2026 पासून लागू केल्या जाणार आहेत. सध्याच्या सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसी 31 डिसेंबर 2025 पर्यंत लागू असतील आणि त्यानंतर नव्या वेतन आयोगाच्या शिफारशी प्रभावी होतील.

दरम्यान नव्या आठव्या वेतन आयोगात सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता त्यांच्या मूळ पगारात विलीन केला जाईल अशी शक्यता सुद्धा व्यक्त केली जात आहे. खरे तर महागाई भत्ता 50% झाल्यानंतर तो मूळ पगारात विलीन केला जातो आणि हीच प्रथा पुढे सुरु राहील आणि नव्या आठव्या वेतन आयोगात महागाई भत्ता मूळ पगारात विलीन होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

फिटमेंट फॅक्टरमध्ये पण वाढ करण्यात येणार आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारावर थेट परिणाम होणार आहे. आजच्या घडीला कर्मचाऱ्यांचा फिटमेंट फॅक्टर 2.57 आहे, जो की 8 व्या वेतन आयोगात 2.86 होण्याची शक्यता आहे. यामुळे किमान पेन्शन सुमारे 25,740 पर्यंत पोहोचणार अशी शक्यता आहे.

तसेच नव्या वेतन आयोगाचा फायदा सुमारे 50 लाख केंद्र सरकारी कर्मचारी आणि 65 लाख पेन्शनधारकांना होणार असा एक अंदाज आहे. नव्या वेतन आयोगात पगार आणि पेन्शन 30% ते 34% पर्यंत वाढणार अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News