Government Employee News : जर तुम्हीही सरकारी कर्मचारी म्हणून शासकीय सेवेत असाल किंवा तुमच्या कुटुंबातून अथवा मित्र परिवारातून कोणी शासकीय सेवेत असेल तर तुमच्यासाठी आजची बातमी खास ठरणार आहे.
ही बातमी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी अधिक खास ठरणार आहे. केंद्रातील सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना 2025 मध्ये किती दिवस सुट्ट्या राहणार या संदर्भात मोठी अपडेट दिली आहे.
दरम्यान आता आपण 2025 मधील केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. 2025 मध्ये 14 सुट्ट्या ठरलेल्या आहेत तर 12 सुट्ट्या ऐच्छिक राहणार आहेत.
2025 मधील ठरलेल्या सुट्ट्या
प्रजासत्ताक दिन
स्वातंत्र्य दिन
महात्मा गांधी यांचा जन्मदिवस
बुद्ध पौर्णिमा
ख्रिसमस
दसरा (विजय दशमी)
दिवाळी (दीपावली)
गुड फ्रायडे
गुरु नानक यांची जयंती
इदुल फितर
इदुल जुहा
महावीर जयंती
मोहरम
पैगंबर मोहम्मद यांचा जन्मदिवस (ईद -ए-मिलाद)
2025 मध्ये किती ऐच्छिक सुट्ट्या असणार?
दसऱ्यासाठी अतिरिक्त दिवस
होळी
जन्माष्टमी (वैष्णवी)
राम नवमी
महा शिवरात्री
गणेश चतुर्थी / विनायक चतुर्थी
मकर संक्रांती
रथयात्रा
ओणम
पोंगल
श्री पंचमी / बसंत पंचमी
विशू/वैशाखी/वैशाखडी/भाग बिहू/मशादी उगदी/
चैत्र सुकलादी / चेटी चांद / गुढी पाडवा / पहिला नवरात्र आणि नवरात्र / छठ पूजाकरवा चौथ.