Government Employee News : महाराष्ट्रातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट समोर येत आहेत. खरंतर राज्यातील काही सरकारी कर्मचाऱ्यांना महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सुट्टी जाहीर करण्याचा एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यातील सर्वच शासकीय आणि निमशासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार नाही. मिळालेल्या माहितीनुसार महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई शहर आणि उपनगरात कार्यरत असणाऱ्या शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांना सुट्टी राहणार आहे.

दरवर्षी महापरिनिर्वाण दिनानिमित्त राजधानी मुंबईत आंबेडकरी अनुयायांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते. राजधानी मुंबईत दरवर्षी महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर भीमसैनिकांची गर्दी होते.
देशभरातून महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी अनुयायांची मोठी गर्दी होत असते. चैत्यभूमी परिसर तसेच मुंबईत लाखोंच्या संख्येने अनुयायी येतात.
यंदाही तसेच परिस्थिती राहणार आहे आणि या अनुषंगाने रेल्वे प्रशासन देखील सज्ज झाले आहे. मध्य रेल्वेच्या माध्यमातून मुंबईत दाखल होणाऱ्या अनुयायांसाठी विशेष गाड्या चालवण्याची घोषणा करण्यात आली आहे.
महापरिनिर्वाण दिनासाठी प्रशासन देखील पूर्णपणे सज्ज झाले आहे. दरम्यान महाराष्ट्र राज्य शासनाने मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यातील शासकीय आणि निम शासकीय कार्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.
येत्या तीन दिवसांनी अर्थातच सहा डिसेंबर 2025 रोजी महापरिनिर्वाण दिन आहे आणि या दिवशी मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यातील सरकारी आणि निमसरकारी कार्यालयांना सुट्टी राहणार आहे.
पण अत्यावश्यक सेवा सुरू राहणार असून त्या विभागातील कामगार व कर्मचाऱ्यांना सुट्टी लागू होणार नाही, असेही जाहीर करण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व विभागातील कर्मचाऱ्यांना मात्र सुट्टी राहील असे पालिकेने स्पष्ट केले आहे.
तसेच ज्या कार्यालयांमध्ये सुट्टी लागू होणार नाही, त्या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांना एक दिवसाची अर्जित रजा दिली जाईल असेही शासन परिपत्रकातून स्पष्ट करण्यात आले आहे.
शासकीय परिपत्रकानुसार मुंबई महानगरपालिकेच्या ठाणे जिल्ह्यातील महानगरपालिका कार्यालयांतही हीच अंमलबजावणी होणार अशीही माहिती देण्यात आली आहे.













