Government Employee News : देशातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी हाती आली आहे. ही बातमी सरकारी नोकरदार मंडळीच्या निवृत्तीसंदर्भातील नियमांबाबत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार केंद्रातील सरकारकडून पुन्हा एकदा निवृत्ती संदर्भातील या नियमांमध्ये बदल करण्यात आला असून याबाबतचा वटहुकूम नुकताच जारी करण्यात आला आहे.

कार्मिक मंत्रालयाच्या अंतर्गत निवृत्ती वेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभाग (DoPPW) ने याबाबतचे मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.
यामुळे जर तुम्हीही सरकारी कर्मचारी असाल किंवा तुमच्या कुटुंबातून अथवा मित्र परिवारातून कोणी शासकीय सेवेत असेल तर तुमच्यासाठी आजची बातमी अतिशय महत्त्वाची ठरणार आहे.
खरतर सरकारकडून जारी करण्यात आलेल्या या मार्गदर्शकतत्त्वात, 18 वर्षे सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना स्वतःची पडताळणी करणे अनिवार्य असेल, असे म्हटले गेले आहे.
या संदर्भात सर्व विभागांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या असून ही प्रक्रिया कोणत्याही परिस्थितीत करावी लागणार असल्याचे सांगितले जात आहे.
या नव्या मार्गदर्शक तत्त्वानुसार आता ज्या कर्मचाऱ्यांनी 18 वर्षे सेवा पूर्ण केली आहे आणि सेवानिवृत्तीसाठी फक्त 5 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे अशा सर्व कर्मचाऱ्यांना नियतकालिक पडताळणी करणे आवश्यक राहणार आहे.
या पडताळणीमुळे कर्मचाऱ्यांची पात्रता सेवा निश्चित करण्यात मदत होईल असा दावा सरकारकडून केला जात आहे. यावरून कर्मचाऱ्यांच्या सर्व महत्त्वाच्या नोंदी निवृत्तीपूर्वी व्यवस्थित केल्या आहेत की नाही हे कळणार आहे.
आता सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो की ही पडताळणी कोण करणार आहे. तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की सरकारने ज्या सूचना दिल्या आहेत त्यानुसार विभागप्रमुख आणि संबंधित कर्मचाऱ्याचे लेखा कार्यालय संयुक्तपणे कर्मचाऱ्याच्या नोंदींची सेवा नियमांनुसार पडताळणी करणार आहेत.
पडताळणीनंतर कर्मचाऱ्याला प्रमाणपत्र देऊन याबाबत माहिती दिली जाईल हे विशेष. हे प्रमाणपत्र पूर्व-निर्धारित स्वरूप 4 मध्ये जारी केले जाणार आहे. केंद्रीय नागरी सेवा (पेन्शन) नियम 2021 अंतर्गत, हे सत्यापन सर्व कर्मचाऱ्यांसाठी अनिवार्य असेल.
कोणत्याही परिस्थितीत, ही पडताळणी निवृत्तीच्या 5 वर्षे आधी पूर्ण झाली पाहिजे. यासह, कर्मचाऱ्याला दरवर्षी त्याची पात्रता सेवा स्थिती सादर करावी लागेल. ही प्रक्रिया ३१ जानेवारीनंतर सुरू होईल.
ही मार्गदर्शक तत्त्वे सरकारी कर्मचाऱ्यांच्या सर्व प्रक्रिया त्यांच्या निवृत्तीपूर्वी पूर्ण करण्यासाठी आहेत. यासह, यामुळे सर्व कर्मचाऱ्यांना त्यांच्या पात्रता सेवा स्थितीबद्दल आधीच माहिती असेल.
या संदर्भात सर्व मंत्रालये आणि विभागांना कठोर सूचनाही जारी करण्यात आल्या आहेत, जेणेकरून ते कर्मचाऱ्यांना योग्य सेवा प्रमाणपत्र वेळेवर सादर करण्यास सांगू शकतील.