Government Employee News : तुम्ही पण महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत सेवा देत आहात का? किंवा तुमच्या कुटुंबातील अथवा मित्र परिवारातील कोणी शासकीय सेवेत असेल तर आजची ही बातमी तुमच्या कामाची ठरणार आहे.
आज आपण राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवीन पेन्शन योजना की युनिफाईड पेन्शन स्कीम अर्थात एकीकृत पेन्शन योजना यापैकी कोणती योजना त्यांच्या फायद्याची आहे याविषयीची डिटेल माहिती आजच्या या लेखातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

जसं की आपणास ठाऊकच आहे की राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आता शासनाच्या माध्यमातून केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धरतीवर नवीन पेन्शन योजना किंवा मग युनिफाईड पेन्शन स्कीम यापैकी एक पेन्शन प्रणाली निवडण्याचा विकल्प उपलब्ध करून दिला आहे.
यामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना कोणते पेन्शन योजना फायदेशीर ठरणार हे जाणून घेणे आवश्यक आहे. यामुळे जर तुम्हीही एनपीएस निवडावी की यूपीएस निवडावी या अडचणीत असाल तर आजची ही बातमी तुम्ही शेवटपर्यंत वाचायला हवी.
कोणती पेन्शन योजना ठरणार बेस्ट?
यूपीएस योजनेचे फायदे आणि तोटे – ही योजना नवीन पेन्शन योजना आणि जुनी पेन्शन योजना यांचा अभ्यास करून तयार करण्यात आली आहे. यामुळे दोन्ही योजनांचे गुण यामध्ये आहेत. या अंतर्गत जुनी पेन्शन योजनेप्रमाणे सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर 50% मूळ वेतन पेन्शन म्हणून देण्याचा विकल्प आहे.
पण यासाठी काही अटी आहेत. जसे की 25 वर्षे सेवा पूर्ण केलेल्यांनाच शेवटच्या वेतनाच्या 50% पेन्शन मिळते. ज्यांची सेवा पंचवीस वर्षे झालेली नसते त्यांना किमान दहा हजार रुपये पेन्शन उपलब्ध करून देण्याची तरतूद आहे.
जर पेन्शन धारकाचा मृत्यू झाला तर कुटुंब निवृत्ती वेतन म्हणून संबंधित कायदेशीर वारसाला पेन्शनच्या 60% रक्कम कुटुंब निवृत्ती वेतन म्हणून देण्यात येणार आहे. पण यूपीएस मध्ये स्वेच्छा निवृत्ती साठी अद्याप तरतूद झालेली नाही.
येत्या काळात कदाचित यामध्ये बदल होऊ शकतो पण सध्या स्थितीला यूपीएस मध्ये स्वेच्छा निवृत्ती म्हणजेच वीआरएस घेणाऱ्यांसाठी पेन्शन बाबत कोणतीच तरतूद नाही. या योजनेत सुद्धा कर्मचाऱ्यांना योगदान द्यावे लागते.
NPS कशी आहे – नवीन पेन्शन योजनेअंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या पगाराच्या (म्हणजेच मूळ वेतन आणि महागाई भत्ता) दहा टक्के रक्कम योगदान द्यावे लागते. यामध्ये सरकार सुद्धा 14% योगदान देते.
दरम्यान, रिटायरमेंट नंतर या योजनेअंतर्गत NPS मध्ये जमा रकमेच्या 60 टक्के रक्कम ही एकरकमी दिली जाते. तसेच अकाउंट मध्ये असणाऱ्या 40 टक्के रकमेवर पेन्शन दिली जाते. म्हणजेच जमा झालेल्या 40% रकमेवर जे व्याज मिळत तीच एनपीएस धारकांची पेन्शन असते.
यात कुटुंब निवृत्तीवेतन बंद करण्यात आले आहे. म्हणजे रिटायर्ड कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबास पेन्शन मिळत नाही. मयत झालेल्या पेन्शन धारकाच्या कुटुंबाला उर्वरित 40 टक्के रक्कम दिली जाते.