Government Employee News : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक कामाची बातमी समोर येत आहे. खरंतर गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याची जोरदार मागणी उपस्थित केली जात आहे. यासाठी राज्य सरकारी कर्मचारी सरकार दरबारी जोरदार पाठपुरावा सुद्धा करत आहेत.
सद्यस्थितीला राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 58 वर्ष आहे. दुसरीकडे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करण्यात आले आहे याव्यतिरिक्त इतरही अनेक राज्यांमधील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष झाले आहे.

महत्वाचे बाब म्हणजे महाराष्ट्र राज्यात कार्यरत असणाऱ्या ड संवर्गातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय देखील राज्य सरकारने 60 वर्षे करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
पण आजही राज्यातील अब आणिक या संवर्गातील राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 58 वर्ष इतके असून यामध्ये आणखी दोन वर्षांची वाढ करण्यात यावी अशी आग्रही मागणी उपस्थित केली जात आहे.
गेल्या शिंदे सरकारच्या काळात या मागणीला सर्वाधिक जोर मिळाला आणि तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ अशी ग्वाही सुद्धा दिली होती. पण आजही राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या या मागणीवर सकारात्मक निर्णय झालेला नाही.
अशी सगळी परिस्थिती असतानाच आता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत एक महत्त्वाचे अपडेट समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचे वय आणखी दोन वर्षांनी वाढवले जाणार आहे.
सध्या केंद्रीय सरकारने कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे इतके असून यामध्ये दोन वर्षांची वाढ करण्याबाबतचा प्रस्तावसध्या केंद्रीय सरकारने कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे इतके असून यामध्ये दोन वर्षांची वाढ करण्याबाबतचा प्रस्ताव विचाराधीन असल्याची खात्रीलायक बातमी समोर आली आहे.
याबाबतचा कॅबिनेट प्रस्ताव तयार झाला असल्याचा मोठा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये करण्यात आला आहे. अलीकडील काही वर्षांमध्ये आपली जीवनशैली पूर्णपणे बदलून गेली आहे आणि याचा परिणाम म्हणून आयुर्मान सुद्धा वाढले आहे.
तसेच सध्याच्या संगणकीय युगामध्ये अनुभवी कर्मचाऱ्यांची पण प्रशासनाला मोठी कमतरता भासत आहे. हेच कारण आहे की, सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याची मागणी आणि गरज अधोरेखित होते.
दरम्यान रिटायरमेंट एज वाढवल्यास प्रशासकीय कामकाज अधिक प्रभावी होईल आणि अनुभवी कर्मचाऱ्यांचा प्रशासनाला आणि शासनाला फायदा होईल असा विश्वास व्यक्त केला जातोय.
यामुळे सरकार दरबारी तयार झालेला हा प्रस्ताव लवकरच कॅबिनेट बैठकीमध्ये सादर करण्यात येईल आणि या प्रस्तावाला लवकरच मंजुरी मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.
दरम्यान केंद्राच्या या प्रस्तावाला मंजुरी मिळाली तर केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 62 वर्ष होणार असून याचा केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा लाभ होणार आहे.
विशेष म्हणजे केंद्रातील सरकारने राज्यांना देखील तेथील राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढविण्याबाबत विचार करण्याचे स्पष्ट निर्देश दिलेले आहेत. यामुळे येत्या काळात महाराष्ट्रातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय सुद्धा वाढू शकते.













