……तर महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई होणार ! नोकरी धोक्यात येण्याची शक्यता

महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या विरोधात काही प्रकरणांमध्ये शिस्तभंगाची कारवाई केली जाऊ शकते. यासंदर्भात फडणवीस सरकारकडून सोमवारी एक महत्त्वाचे परिपत्रक काढण्यात आले आहे.

Published on -

Government Employee News : महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी फडणवीस सरकारने सोमवारी एक परिपत्रक काढून नवीन आदेश जारी केला आहे. या नव्या आदेशानुसार राज्य शासकीय सेवेतील काही सरकारी कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे. खरंतर राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांच्या सोशल मीडिया वापराबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

दरम्यान या मार्गदर्शक सूचनांचे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी पालन केले नाही तर त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होणार आहे. खरंतर अलीकडे सरकारी कर्मचाऱ्यांकडून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर स्वतःची प्रसिद्धी करण्याचे प्रकार वाढले आहेत. हीच बाब लक्षात घेऊन राज्य सरकारने या नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. 

काय आहेत नव्या मार्गदर्शक सूचना?

आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आपल्या वैयक्तिक सोशल मीडिया अकाऊंटवर गणवेशातील फोटो, कार्यालयाचे लोगो, पदनाम, तसेच सरकारी मालमत्तेचे फोटो किंवा व्हिडीओ पोस्ट करता येणार नाहीत असे या परिपत्रकात सांगितले गेले आहे.

एवढेच नाही तर सरकारी कर्मचाऱ्यांनी जर राज्य, केंद्र आणि इतर राज्यातील सरकार विरोधात आणि सरकारी निर्णयाविरोधात समाज माध्यमांवर नकारात्मक प्रतिक्रिया सुद्धा देता येणार नाही. सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्रातील सरकारकडून प्रतिबंधित अशा एप्लीकेशनचा वापर करता येणार नाही.

सरकारी कर्मचाऱ्यांना आपली पर्सनल आणि समाज माध्यमांवरील खाती वेगळी ठेवावी लागणार आहेत. तसेच कर्मचाऱ्यांना जर राज्य सरकारच्या योजनांचा प्रचार आणि प्रसार करायचा असेल तर यासाठी संबंधितांची परवानगी घेणे सुद्धा आवश्यक असेल.

तथापि, व्हाट्सअप तसेच टेलिग्राम सारख्या मेसेजिंग ॲप्लिकेशनचा वापर फक्त अधिकृत कामांसाठी संपर्क आणि समन्वय साधण्यासाठी करता येऊ शकतो. राज्य सरकारच्या यशस्वी कार्यक्रमाच्या यशाबद्दल म्हणजेच टीमच्या यशाबद्दल लिहिता येईल मात्र वैयक्तिक प्रसिद्धी करता येणार नाही.

एवढेच नाही तर राज्य शासकीय सेवेतील सरकारी कर्मचाऱ्यांना कोणताही आक्षेपार्ह, समजात द्वेष पसरवणारा किंवा समाजात फूट पाडणारा मजकूर पुढे पाठवता येणार नाही तसेच सामायिक करता येणार नाही किंवा अपलोड करता येणार नाही. परवानगी घेतल्याशिवाय कोणताही शासकीय दस्तऐवज शेअर किंवा फॉरवर्ड करता येणार नाही. 

मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन झाल्यास काय कारवाई होणार?

सोमवारी राज्य सरकारने एक परिपत्रक काढून सोशल मीडिया वापराबाबतच्या या मार्गदर्शक सूचना जारी केलेल्या आहेत. दरम्यान जर या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन झाले तर संबंधितांवर कारवाई सुद्धा होणार आहे.

मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन झाल्यानंतर शिस्तभंगाची कारवाई होईल अशी माहिती देण्यात आली आहे. यामुळे सोशल मीडिया वापराबाबत सरकारी कर्मचाऱ्यांना अधिक दक्ष रहावे लागणार आहे. कारण त्यांच्या एका छोट्याशा चुकीमुळे त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!