…….तर महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांचा पगार कापला जाणार !  

Published on -

Government Employee News : राज्य शासकीय सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. शासनाने आता काही नियम अधिक कठोर केले आहेत. शासकीय कार्यालयांत सर्वसामान्य नागरिकांना अनेकदा अडचणींचा सामना करावा लागतो. यातील सर्वात मोठी अडचण म्हणजे कोण अधिकारी आहेत हेच समजत नाही.

कित्येकदा अधिकारी व कर्मचाऱ्यांची ओळख पटत नसल्याने सर्वसामान्य व्यक्तींना मनस्ताप सहन करावा लागतो. महत्वाची बाब म्हणजे काही भामटे लोक आपण सरकारी कर्मचारी आहोत असे भासवून सर्वसामान्यांची दिशाभूल करतात तर काही प्रकरणात सर्व सामान्यांची आर्थिक फसवणूक सुद्धा होते.

आता साहजिकच यावरून अनेक गैरप्रकार, वादही होतात. यावरच रामबाण उपाय म्हणून आता सरकारी कर्मचाऱ्यांना कार्यालयात ओळखपत्र अर्थात आयडी कार्ड लावणे बंधनकारक राहणार आहे. खरंतर कार्यालयात आयडी कार्ड लावणे हे बंधनकारक आहेच मात्र नियमांचे कुठेच पालन होत नाही.

यामुळे सर्वसामान्यांना त्रास होतो. अलीकडे विविध विभागांमध्ये लाचखोरीचे प्रमाण वाढताना दिसत आहे. पण अशा प्रकरणांमध्ये पंचनामा करताना संबंधित लाच घेणाऱ्या कर्मचाऱ्याकडे आयकार्ड नसल्याचे समोर येते. कर्मचारी शासकीय बैठका असल्यात तरीसुद्धा आय कार्ड घालणे पसंत करत नाहीत.

सभागृहात प्रवेश घेण्यापुरते आय कार्ड लावतात आणि त्यानंतर मग ते आय कार्ड खिशात जात. शासकीय कार्यालयात कित्येक कर्मचारी विना ओळखपत्र काम करतात. आय कार्ड बाबत लागू असणाऱ्या नियमांचे कुठेच काटेकोर पालन होत नसल्याचे सातत्याने समोर येत आहे.

दरम्यान आता यावर तोडगा म्हणून शासकीय कार्यालयात आय कार्ड न लावणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार कापला जाऊ शकतो अशा चर्चा सुरू आहेत. राज्य सरकारकडून जे कर्मचारी शासकीय कार्यालयात ड्युटी कालावधीत आय कार्ड घालणार नाहीत त्यांचा पगार कापला जाईल असे संकेत मिळत आहेत.

या प्रकरणात संभाजीनगरचे निवासी उपजिल्हाधिकारी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व कर्मचाऱ्यांना ओळखपत्र लावणे बंधनकारक केले असल्याचे सांगितले आहे. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात विना ओळखपत्र कोणताच कर्मचारी येत नाही अशी ग्वाही देखील त्यांनी दिली आहे.

नक्कीच संभाजीनगरच्या जिल्हाधिकार्यालयात ज्या पद्धतीने सर्वजण आय कार्ड घालतात त्याच पद्धतीने इतर सर्व शासकीय कार्यालयांमध्ये देखील सरकारी कर्मचाऱ्यांनी आय कार्ड घालणे आवश्यक आहे. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News