Government Employee News : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे. देशातील काही सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याबाबत सरकारकडून लवकरच निर्णय होणे अपेक्षित आहे.
खरे तरच सद्यस्थितीला केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे एवढे निश्चित करण्यात आले आहे. यासोबतच देशातील अनेक राज्यांमधील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय सुद्धा तेवढेच आहे.

मात्र महाराष्ट्रात सेवानिवृत्तीचे वय 58 वर्षे एवढे असून यामध्ये दोन वर्षांची वाढ करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून उपस्थित होत आहे. भूतपूर्व मुख्यमंत्री श्रीमान एकनाथ शिंदे यांनी राज्य कर्मचाऱ्यांच्या या मागणीवर सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन दिले होते.
मात्र राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याबाबत अजूनही कोणताच ठोस निर्णय झालेला नाही आणि यामुळे राज्य कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी सुद्धा आहे.
दरम्यान आता केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे ती म्हणजे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय पुन्हा एकदा वाढवले जाईल अशी बातमी समोर येत आहे.
सेवानिवृत्तीचे वय दोन वर्षांनी वाढणार
केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष एवढे फायनल करण्यात आले आहे. केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या धरतीवर विविध राज्यांमधील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय सुद्धा 60 वर्षे करण्यात आले आहे.
पण आता केंद्रातील सरकार सेवानिवृत्तीचे वय दोन वर्षांनी वाढवून 62 वर्ष करण्याच्या तयारीत असल्याची बातमी समोर आली असून याबाबतचा प्रस्ताव सुद्धा फायनल करण्यात आला असल्याचे बोलले जात आहे.
या प्रस्तावाला येत्या काळात केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर केले जाईल आणि प्रस्तावाला मंजुरी दिली जाईल असा सुद्धा दावा केला जातोय. थोडक्यात हा प्रस्ताव आता अंतिम टप्प्यात पोहोचला असल्याच्या चर्चा सुरू आहेत.
सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे अलीकडील काही वर्षांमध्ये वैद्यकीय सोयी – सुविधा मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. यामुळे लोकांचे आयुर्मान सुद्धा वाढले आहे.
यामुळेच सरकारी यंत्रणेमध्ये कर्मचाऱ्यांचा अनुभवाचा वापर करून प्रशासन अधिक सक्षम बनवण्याचा विचार करता सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याचा प्रस्ताव तयार झाला आहे.
दरम्यान सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याबाबत सकारात्मक निर्णय झाला तर कर्मचाऱ्यांना दोन वर्ष अतिरिक्त सेवा देता येणार आहे. सोबतच त्यांना सेवानिवृत्तीनंतर अधिक आर्थिक लाभ मिळू शकणार आहेत. दोन वर्ष सेवा कालावधी वाढणार असल्याने पेन्शनची रक्कम सुद्धा वाढणार आहे.













