Government Employee News : तुम्ही पण सरकारी कर्मचारी म्हणून सेवा देत आहात का किंवा तुमच्या कुटुंबातून कोणी शासकीय सेवेत कार्यरत आहे का? मग तुमच्यासाठी आजची बातमी खास ठरणार आहे. खरेतर, सरकारी नोकरी हा एक जिव्हाळ्याचा विषय आहे. कारण म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांना नोकरीवर असताना जेवढे लाभ मिळतात तेवढेच लाभ नोकरीवरून रिटायर झाल्यानंतर सुद्धा मिळतात.
दरम्यान आज आपण सरकारी कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांना कोणते तीन मोठे आर्थिक लाभ दिले जातात? याचीच माहिती या लेखातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. खरेतर, सरकारी सेवेतून निवृत्त झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना अनेक लाभ मिळतात आज आपण त्यातील तीन मोठे लाभ जाणून घेणार आहोत.

आयुष्यभराचा आर्थिक आधार मिळावा यासाठी शासनाकडून निवृत्तीनंतर तीन महत्त्वपूर्ण लाभ दिले जातात. या लाभांमुळे सेवानिवृत्तीनंतर सुद्धा कर्मचाऱ्यांचे जीवन अधिक सुरक्षित आणि आर्थिकदृष्ट्या स्थिर राहते.
रिटायर कर्मचाऱ्यांना मिळतात हे तीन लाभ
सेवानिवृत्ती उपदान : रिटायर्ड झाल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळते हे तुम्हाला माहीतच असेल. मात्र पेन्शन सोबतच कर्मचाऱ्यांना आणखी काही लाभ मिळतात आणि यातीलच एक महत्त्वाचा लाभ आहे ग्रॅच्युइटीचा.
निवृत्तीनंतर दिली जाणारी सर्वात मोठी एकरकमी आर्थिक मदत म्हणजे सेवानिवृत्ती उपदान. रिटायरमेंट नंतर मिळणारी ग्रॅच्यूटी पूर्णपणे कर्मचाऱ्यांच्या सेवा कालावधीवर अवलंबून असते. ग्रॅच्युईटी मोजण्यासाठी एक विशेष सूत्र वापरले जाते.
शेवटचे मूळ वेतन × (सेवाकाळ × 2) / 4 या सूत्राचा वापर करून ग्रॅच्यूटीची रक्कम ठरते. आधी सरकारकडून सरकारी कर्मचाऱ्यांना जास्तीत जास्त 14 लाख रुपये एवढी ग्रॅच्युटी मिळत होती मात्र आता यामध्ये बदल झाला आहे आणि ग्रॅच्युइटीची कमाल रक्कम 20 लाख रुपये करण्यात आली आहे.
निवृत्तीवेतन : रिटायर्ड कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटी प्रमाणेच निवृतीवेतन म्हणजेच पेन्शन पण मिळते. ज्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू आहे अशा कर्मचाऱ्यांना 20 वर्षांची अर्हताकारी सेवा पूर्ण केल्यानंतर पूर्ण पेन्शन मिळते.
ओ पी एस कर्मचाऱ्यांना आपल्या शेवटच्या पगाराच्या 50 टक्के एवढी रक्कम पेन्शन म्हणून मिळते. पण नवीन पेन्शन योजनेनंतर ही परिस्थिती बदलली आहे. दरम्यान अलीकडेच नवीन पेन्शन योजनेच्या कर्मचाऱ्यांना यूपीएसचा पर्याय सुद्धा उपलब्ध करून देण्यात आला आहे.
पण UPS योजनेत पूर्ण पेन्शन मिळवण्यासाठी कर्मचाऱ्यांची किमान 25 वर्षे सेवा पूर्ण असणे बंधनकारक आहे. विशेष म्हणजे, स्वेच्छा निवृत्ती (VRS) घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना या सुधारित योजनेमध्ये जुनी पेन्शन योजनेइतके लाभ मिळत नाहीत. त्यामुळे पेन्शन अथवा सेवानिवृत्तीची योजना आखताना नियमांचे बारकाईने परीक्षण करणे गरजेचे ठरते.
अंशराशीकरण : सेवानिवृत्तीनंतर कम्युटेड पेन्शनचा ऑप्शन मिळतो. निवृत्तीनंतर काही रक्कम एकरकमी स्वरूपात मिळावी, यासाठी कर्मचाऱ्यांना Commutation अर्थातच अंशराशीकरणाची सुविधा देण्यात येते. मासिक पेन्शनची काही टक्के रक्कम एकदाच प्राप्त करण्याची ही योजना असून, उर्वरित जीवनात कमी पेन्शन मिळते.
याची गणना सुद्धा एका विशेष सूत्रानुसार केली जाते. मुळ वेतन × 40% × 12 × अंशराशीकरणाच्या तक्त्याचे मूल्य, अशा पद्धतीचे हे सूत्र आहे. पण या तक्त्यांनुसार मूल्ये बदलत असल्याने कर्मचाऱ्यांनी याची अचूक माहिती निवृत्तीपूर्वी घेणे आवश्यक आहे.













