Government Employee News : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. नव्या वर्षाची सुरुवात कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची ठरणार आहे.
माहे मार्चमध्ये राज्य कर्मचाऱ्यांना एकाचवेळी तीन मोठे आर्थिक लाभ मिळणार असून, त्यामुळे त्यांच्या एकूण वेतनात मोठी वाढ होणार आहे. महागाई भत्ता वाढ, महागाई भत्त्याची थकबाकी आणि प्रोत्साहन भत्ता फरक असे हे तीन महत्त्वाचे लाभ आहेत.

1) ३ टक्के महागाई भत्ता (DA) वाढ
राज्य सरकारकडून केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्क्यांची वाढ करण्यात येणार आहे. सध्या ५५ टक्के असलेला महागाई भत्ता वाढून ५८ टक्के होणार आहे. महागाईच्या वाढत्या दरांचा विचार करता ही वाढ कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा देणारी ठरणार आहे. या वाढीमुळे प्रत्येक कर्मचाऱ्याच्या मासिक वेतनात थेट वाढ होणार आहे.
2) महागाई भत्ता थकबाकी मिळणार
महागाई भत्त्यातील ३ टक्के वाढ दि. ०१ जुलै २०२५ पासून लागू होणार असल्याने, त्या तारखेपासूनची थकबाकी कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. ही डी.ए. थकबाकी माहे जानेवारी पेड इन फेब्रुवारी या वेतनासोबत अदा केली जाणार आहे. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यात कर्मचाऱ्यांच्या खात्यात मोठी रक्कम जमा होण्याची शक्यता आहे.
3) प्रोत्साहन भत्ता फरकाचा लाभ
राज्य सरकारच्या वित्त विभागाच्या परिपत्रकानुसार, आदिवासी व नक्षलग्रस्त भागात कार्यरत कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रोत्साहन भत्ता देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या निर्णयानुसार कर्मचाऱ्यांना मूळ वेतनाच्या १५ टक्के व किमान २०० रुपये तसेच कमाल १५०० रुपये या मर्यादेत प्रोत्साहन भत्ता अदा केला जाणार आहे.
विशेष बाब म्हणजे, हा प्रोत्साहन भत्ता सहाव्या वेतन आयोगापासून लागू असल्याने, दि. ०१ जानेवारी २००६ पासूनचा प्रोत्साहन भत्ता फरक कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांना मोठी थकबाकी मिळण्याची शक्यता असून, हा लाभ शिक्षण विभागासह संबंधित विभागांतील कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
कर्मचाऱ्यांना मिळणार मोठा आर्थिक फायदा
महागाई भत्ता वाढ, थकबाकीची रक्कम आणि प्रोत्साहन भत्ता फरक यामुळे जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात राज्य कर्मचाऱ्यांच्या उत्पन्नात मोठी वाढ होणार आहे. या निर्णयांमुळे कर्मचारी वर्गात समाधानाचे वातावरण असून, सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले जात आहे.











