सरकारी कर्मचाऱ्यांसाठी Good News ! आता ‘या’ कामासाठी सुद्धा मिळणार भरपगारी 30 दिवसांची सुट्टी

केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना आपल्या वृद्ध आई-वडिलांच्या देखभालीसाठी रजा मिळते का? असा प्रश्न सरकारला उपस्थित करण्यात आला होता आणि याच प्रश्नाच्या उत्तरात सरकारकडून मोठी माहिती देण्यात आली आहे.

Published on -

Government Employee : केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आजची ही बातमी फारच कामाची ठरणार आहे. खरे तर 30 जून ते 18 जुलै 2025 या कालावधीत महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन संपन्न झाले. या पावसाळी अधिवेशनात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रश्नांवर चर्चा झाली.

दरम्यान आता संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले आहे. केंद्रीय विधिमंडळाच्या म्हणजेच संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सुद्धा केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रश्नांवर चर्चा सुरु झाली आहे.

याचं चर्चेदरम्यान संसदेच्या वरिष्ठ सभागृहातून म्हणजेच राज्यसभेतून केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी समोर येत आहे. केंद्रीय कार्मिक राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी काल 24 जुलै 2025 रोजी राज्यसभेत सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्यांबाबत मोठी माहिती दिली आहे.

केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी केंद्रीय कर्मचाऱ्यांना आपल्या वयोवृद्ध पालकांच्या देखभालीसाठी किंवा इतर कोणत्याही वैयक्तिक कारणांसाठी दरवर्षी 30 दिवसांची अर्जित रजा म्हणजेच भरपगारी रजा दिली जाते अशी माहिती दिली आहे. 

केंद्रीय कर्मचाऱ्यांना ज्येष्ठ पालकांच्या देखभालीसाठी रजा मिळते का?

आम्ही आपणास सांगू इच्छितो की काल राज्यसभेत एका सदस्याकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या ज्येष्ठ पालकांच्या देखभालीसाठी रजेची तरतूद आहे का असा प्रश्न विचारण्यात आला होता.

या प्रश्नाच्या लेखी उत्तरात केंद्रीय कार्मिक राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी केंद्रीय कर्मचाऱ्यांना केंद्रीय नागरी सेवा (रजा) नियम, 1972 अंतर्गत विविध प्रकारच्या रजा दिल्या जातात अशी माहिती दिली आहे.

दरम्यान आता आपण या नियमानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांना किती सुट्ट्या मिळतात आणि जेष्ठ पालकांना सांभाळण्यासाठी किती दिवसांच्या सुट्ट्या मिळू शकतात याबाबत माहिती पाहुयात.

केंद्रीय कर्मचाऱ्यांना 30 दिवसांची अर्जित रजा मिळते, या सुट्ट्या केंद्रीय कर्मचारी कोणत्याही वैयक्तिक कारणांसाठी घेऊ शकतात, आपल्या वृद्ध आई-वडिलांच्या देखभालीसाठीही या सुट्ट्या मंजूर होतात.

याशिवाय केंद्रीय कर्मचाऱ्यांना 20 दिवसांची अर्धवेतन रजा मिळते. तसेच, केंद्रीय कर्मचाऱ्यांना 8 दिवसांची Casual Leave म्हणजे नैमित्तिक रजा मिळते, ही रजा आकस्मिक कामांसाठी वापरता येऊ शकते.

यासोबतच केंद्रीय कर्मचाऱ्यांना विशिष्ट सणांसाठी किंवा वैयक्तिक महत्त्वाच्या दिवसांसाठी 2 दिवसांची प्रतिबंधित सुट्टी मिळते. केंद्रीय मंत्र्यांनी दिलेल्या या माहितीमुळे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना आपल्या वृद्ध आई-वडिलांच्या सांभाळासाठी देखील 30 दिवसांची भरपगारी रजा मिळू शकते हे स्पष्ट झाले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe