Government Job : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुण उमेदवारांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. तुम्ही पण सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर नक्कीच आजची ही बातमी तुमच्यासाठी खास राहणार आहे.
विशेषता ज्यांना मुंबईत सरकारी नोकरी करायची असेल त्यांच्यासाठी ही बातमी खास राहणार आहे. कारण की, राजधानी मुंबईत हजारो जागांसाठी नोकर भरती जाहीर करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मुंबई हायकोर्टात विविध रिक्त जागांसाठी नोकर भरती जाहीर करण्यात आली असून आज आपण याच नोकर भरतीची डिटेल माहिती या लेखातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
मुंबई उच्च न्यायालयाने क्लर्क (लिपिक), शिपाई, स्टेनोग्राफर आणि ड्रायव्हर (चालक) अशा विविध पदांसाठी बंपर भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 15 डिसेंबर 2025 पासून सुरू होणार असून उमेदवारांना अधिकृत वेबसाइट bombayhighcourt.nic.in वर ऑनलाईन अर्ज करता येईल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 जानेवारी 2026 अशी निश्चित करण्यात आली आहे. या भरतीत 10 वी उत्तीर्ण ते पदवीधर उमेदवारांना संधी असून प्रत्येक पदासाठी वेगवेगळ्या शैक्षणिक पात्रता व अटी निश्चित आहेत.
क्लर्क पदासाठी उमेदवारांकडे पदवीसोबत टायपिंग सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे. शिपाई पदासाठी 10 वी उत्तीर्ण असणे आणि मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य आहे. तर चालक पदासाठी 10 वी उत्तीर्ण, वैध एलएमवी लायसन्स आणि किमान तीन वर्षांचा ड्रायव्हिंग अनुभव असणे गरजेचे आहे.
स्टेनोग्राफर पदांसाठी दोन गटांमध्ये पात्रता दिली आहे. स्टेनोग्राफर लोअर ग्रेडसाठी पदवी, 80 wpm शॉर्टहँड आणि 40 wpm टायपिंग स्पीड आवश्यक आहे. स्टेनोग्राफर हायर ग्रेडसाठी पदवी, 100 wpm शॉर्टहँड आणि 40 wpm टायपिंग स्पीड अनिवार्य आहे.
उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, कौशल्य चाचणी आणि कागदपत्र तपासणीच्या आधारे करण्यात येणार आहे. वयोमर्यादा सर्व पदांसाठी 18 ते 38 वर्षे अशी ठेवण्यात आली आहे. पगारमानदेखील या भरतीचे महत्त्व वाढवणारे आहे.
क्लर्क पदासाठी दरमहा 29,200 ते 92,300 रुपये, स्टेनोग्राफर लोअर ग्रेडसाठी 49,100 ते 1,55,800 रुपये, तर हायर ग्रेडसाठी 56,100 ते 1,77,500 रुपये पगार संरचना निश्चित आहे.
अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी वेबसाइटवर जाऊन Recruitment विभागातील नोटिफिकेशन उघडावे. त्यानंतर Apply Online लिंकवर क्लिक करून आवश्यक माहिती भरावी व फोटो-सही अपलोड करावी. पदानुसार शुल्क भरल्यानंतर फॉर्मची प्रिंट काढून ठेवावी.
या भरतीमुळे राज्यातील हजारो तरुणांना न्यायव्यवस्थेत करिअर करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. तरण्या-तरुणींमध्ये या भरतीबाबत उत्सुकता वाढली असून अर्ज प्रक्रियेची आतुरतेने वाट पाहिली जात आहे.













