Government Job : जर तुमचंही सरकारी नोकरी करण्याचं स्वप्न असेल आणि त्यासाठी तुम्ही तयारी करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NPCIL) यांनी विविध पदांसाठी भरती जाहीर केली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.
NPCIL ही भारत सरकारच्या परमाणू ऊर्जा विभागाच्या अधीन कार्यरत असलेली प्रतिष्ठित सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी आहे. त्यामुळे येथे नोकरी मिळणे म्हणजे सुरक्षित करिअर आणि चांगल्या पगाराची हमी मानली जाते.

या भरतीअंतर्गत सायंटिफिक असिस्टंट, स्टायपेन्ड्री ट्रेनी/सायंटिफिक असिस्टंट, स्टायपेन्ड्री ट्रेनी/टेक्निशियन, एक्स-रे टेक्निशियन आणि असिस्टंट ग्रेड-I अशा विविध पदांचा समावेश आहे. निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक वेतन, शासकीय सुविधा तसेच करिअरमध्ये प्रगतीची उत्तम संधी मिळणार आहे.
इच्छुक उमेदवारांनी NPCIL च्या अधिकृत वेबसाइट www.npcilcareers.co.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 फेब्रुवारी 2026 असून उमेदवारांनी शेवटच्या दिवसाची वाट न पाहता लवकर अर्ज करणे आवश्यक आहे.
पात्रतेबाबत माहिती पाहता, स्टायपेन्ड्री ट्रेनी (ST/SA) पदासाठी मान्यताप्राप्त संस्थेतून किमान 60 टक्के गुणांसह अभियांत्रिकी डिप्लोमा आवश्यक आहे. सायंटिफिक असिस्टंट पदासाठी सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा ग्रामीण अभियांत्रिकीतील डिप्लोमा असावा. स्टायपेन्ड्री ट्रेनी पदासाठी संबंधित विषयात किमान 60 टक्के गुणांसह बी.एससी. पदवी आवश्यक आहे.
एक्स-रे टेक्निशियन पदासाठी 10+2 विज्ञान शाखा आणि एक्स-रे किंवा रेडिओग्राफीतील पात्रता आवश्यक आहे. तर असिस्टंट ग्रेड-I पदासाठी संबंधित विषयातील बॅचलर पदवी असणे बंधनकारक आहे.
अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन असून उमेदवारांनी वैध मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडीच्या सहाय्याने नोंदणी करावी लागेल. नोंदणी झाल्यानंतर लॉगिन करून अर्जाचा फॉर्म भरायचा आहे, आवश्यक माहिती व कागदपत्रे अपलोड करायची आहेत आणि शुल्क भरून अर्ज सबमिट करायचा आहे.
भविष्यातील संदर्भासाठी अर्जाचा प्रिंटआउट काढून ठेवण्याचा सल्ला दिला जात आहे. सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी ही NPCIL भरती एक सुवर्णसंधी ठरणार आहे.













