केंद्र सरकारची भन्नाट योजना ! ‘या’ लोकांना बिजनेस उभारण्यासाठी मिळणार 300000 रुपये

Published on -

Government Scheme : शासनाच्या माध्यमातून देशभरातील गरजू नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत. तीन वर्षांपूर्वी शासनाने अशीच एक योजना सुरू केली आहे ज्या अंतर्गत नव्याने व्यवसाय सुरू करणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना तीन लाख रुपयांचे कर्ज दिले जात आहे.

पारंपरिक व्यवसाय करणारे कारागीर आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारने ही कौतुकास्पद योजना सुरू केली. प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना असे याचे नाव.

याचा मुख्य उद्देश म्हणजे पारंपरिक व्यवसायांना आधुनिक ओळख देणे, कौशल्यवृद्धी करणे व स्वयंरोजगारासाठी आवश्यक आर्थिक पाठबळ देणे. महत्वाची बाब म्हणजे योजना सुरू झाल्यापासून आत्तापर्यंत हजारो लोकांनी यात भाग घेतलाय.

देशभरातून मोठ्या संख्येने कारागीर या योजनेत सहभागी होत असून प्रशिक्षण, साधनसामग्रीचा लाभ घेत आहेत. तसेच यातील काही लोक परवडणाऱ्या कर्जाचा लाभ घेऊन आपला पारंपारिक व्यवसाय मोठा करत आहेत.

कसे आहे स्वरूप?

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना फक्त कर्जापुरती मर्यादित नाही. याअंतर्गत लाभार्थ्यांना त्यांच्या व्यवसायाशी संबंधित आधुनिक प्रशिक्षण दिले जाते. यामुळे कारागिरांचे कौशल्य अधिक दर्जेदार होते व कामाची गुणवत्ता वाढते.

तसेच ट्रेनिंग मध्ये सरकारकडून दररोज 500 रुपयांचा स्टायपेंड पण दिला जातो. यामुळे प्रशिक्षण घेत असताना उत्पन्नात कोणतीही अडचण निर्माण होत नाही. याशिवाय साधनसामग्रीसाठी 15 हजार रुपयांची टूलकिट पण दिली जाते.

आर्थिक मदतीच्या दृष्टीने ही योजना अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. पहिल्या टप्प्यात लाभार्थ्यांना १ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते. हे कर्ज १८ महिन्यांच्या आत परतफेड करणे अपेक्षित आहे.

वेळेवर कर्जफेड केल्यास दुसऱ्या टप्प्यात २ लाख रुपयांपर्यंतचे अतिरिक्त कर्ज ३० महिन्यांसाठी मंजूर होते. अशा प्रकारे एकूण ३ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज या योजनेअंतर्गत उपलब्ध होते.

हे कर्ज सुमारे ५ टक्के इतक्या कमी व्याजदराने दिले जाते, त्यामुळे पारंपरिक कारागिरांना बँकांकडून महाग कर्ज घेण्याची गरज भासत नाही. पीएम विश्वकर्मा योजनेत सध्या १८ पारंपरिक व्यवसायांचा समावेश करण्यात आला आहे.

यामध्ये गवंडी, लोहार, शिंपी, नाव्ही, धोबी, मोची, दगडकाम करणारे, शिल्पकार, खेळणी व बाहुली बनवणारे, टोपली-चटई-झाडू बनवणारे, कुलूप व टूलकिट बनवणारे, माळा व मोती बनवणारे तसेच बोट बांधणारे कारागीर यांचा समावेश आहे.

जर तुम्ही यापैकी कोणत्याही पारंपरिक व्यवसायात कार्यरत असाल आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा किंवा वाढवायचा असेल, तर प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी ठरू शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News