Government Scheme : देशभरातील शेतकऱ्यांना लवकरच एक मोठी भेट मिळणार आहे. केंद्रातील मोदी सरकार पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या बाबतीत लवकरच एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची बातमी समोर आली आहे. एक फेब्रुवारी 2025 ला केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार आहे.
नरेंद्र मोदी सरकार आपल्या तिसऱ्या कार्यकाळात सादर करणाऱ्या या अर्थसंकल्पाकडे साऱ्या देशाचे लक्ष लागून राहणार आहे. या अर्थसंकल्पात केंद्रातील सरकार कोण कोणते निर्णय घेते हे नक्कीच पाहण्यासारखे ठरेल. खरेतर, बजेट 2025 सादर होण्यास आता अवघ्या काही दिवसांचा काळ बाकी आहे.
दिल्लीमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणूका पाहता निवडणूक आयोग सध्या काही योजनांच्या घोषणांना पायबंद घालू शकतो. पण तरीही केंद्रातील मोदी सरकार काही योजनांच्या बाबतीत मोठा निर्णय घेईल असे म्हटले जात आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांसाठी देखील एक मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे.
मोदी सरकार शेतकऱ्यांसाठी हा निर्णय घेणार
केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना मोदी सरकार विविध घटकातील नागरिकांना खुश करण्याचा प्रयत्न करणार आहे. याचाच एक भाग म्हणून शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी पीएम किसान सन्माननीय योजनेच्या बाबत मोठा निर्णय होऊ शकतो असे म्हटले जात आहे.
पी एम किसान सन्मान निधी योजना ही 2019 मध्ये सुरू झाली. या योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयाचा लाभ दिला जात आहे. दोन हजार रुपयांचा एक हप्ता याप्रमाणे या पैशांचे वितरण केले जात आहे.
आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर एकूण 18 हप्ते वितरित करण्यात आले असून या योजनेचा 19 वा हप्ता कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकतो या संदर्भात एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. या योजनेचा पुढील 19 वा हप्ता हा फेब्रुवारी महिन्यात खात्यावर जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल अशी माहिती समोर आली आहे. तथापि या संदर्भात केंद्रातील सरकारकडून कोणतीच अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही यामुळे या योजनेचा पुढील हप्ता फेब्रुवारी महिन्यात जमा होणार का हे पाहणे उत्सुकतेच ठरणार आहे.
दुसरीकडे आता या योजनेच्या बाबतीत अर्थसंकल्पात मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. 19 वा हप्ता खात्यात जमा होण्यापूर्वीच या योजनेच्या बाबतीत मोठा निर्णय घेतला जाईल आणि या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या रकमेत वाढ होऊ शकते. सध्या या योजनेच्या माध्यमातून दरवर्षी सहा हजार रुपये जमा केले जात आहेत मात्र ही रक्कम बारा हजार रुपयांपर्यंत वाढवली जाऊ शकते असा दावा करण्यात आला आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन याबाबत अर्थसंकल्पात निर्णय घेतला असे म्हटले जात आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या बाबत हा निर्णय झाला तर नक्कीच देशभरातील शेतकऱ्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे.
पीएम-किसान योजनेत वार्षिक 6,000 रुपये देण्यात येतात पण ही रक्कम यंदा 12,000 रुपये होण्याची शक्यता आहे. याबाबतचा निर्णय केंद्र अर्थसंकल्पात होण्याचे दाट शक्यता वर्तवली जात आहे. यासाठी केंद्र सरकारकडे गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने पाठपुरावा देखील केला जात आहे. म्हणून आता या रक्कमेत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.