Gratuity Money 2025 : खाजगी क्षेत्रात काम करणारे कर्मचारी असो किंवा सरकारी कर्मचारी असो साऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर काय-काय आर्थिक लाभ मिळणार याबाबत जाणून घेण्याची उत्सुकता असते. आपण आयुष्यभर जिथे प्रामाणिकपणे काम करतो त्यानंतर ही उत्सुकता असणे स्वाभाविकच आहे. खरंतर सेवानिवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युईटी सुद्धा मिळत असते.
एखाद्या कंपनीत सलग पाच वर्षे सेवा दिलेल्या कर्मचाऱ्यांना बक्षीस म्हणून ग्रॅच्युईटी दिली जाते. पण अनेकांना ग्रॅच्युइटीबाबत असणारे नियम माहिती नाहीयेत. म्हणूनच आज आपण ग्रॅच्युईटीचे नियम अगदी थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

आज आपण एखाद्या कर्मचाऱ्याने पंधरा वर्षे नोकरी केली आणि त्याचा शेवटचा पगार 50 हजार रुपये असेल तर त्याला नियमानुसार किती ग्रॅच्युईटी मिळणार याचे कॅल्क्युलेशन देखील समजून घेणार आहोत जेणेकरून कर्मचाऱ्यांना त्यांच्या पगारानुसार आणि सेवा कालावधीनुसार त्यांना किती ग्रॅच्युइटी मिळणार हे सहजपने काढता येईल. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया या महत्वपूर्ण माहिती विषयी.
किती ग्रॅच्युईटी मिळणार?
ग्रॅच्युईटीची रक्कम ही पगारानुसार आणि सेवा कालावधीनुसार ठरत असते. यासाठी एक फिक्स फॉर्म्युला सुद्धा वापरला जात असतो. (शेवटचा पगार) x (कंपनीमध्ये काम केलेल्या वर्षांची संख्या) x (१५/२६) हा ग्रॅच्युटी मोजण्याचा एक फिक्स फॉर्मुला आहे.
या फॉर्मुलानुसार कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युईटीची रक्कम मिळत असते. मात्र ग्रॅच्युइटीची रक्कम त्याच कर्मचाऱ्यांना मिळते जे कर्मचारी ग्रॅच्युइटीसाठी पात्र असणाऱ्या कंपनीत काम करतात. तसेच जे कर्मचारी पाच वर्षे सेवा देतात त्यांनाचं त्याचा लाभ मिळतो.
जर समजा एखाद्या कर्मचार्याने चार वर्षे आणि आठ महिना कंपनीत काम केले असेल तर असे कर्मचारी सुद्धा ग्रॅच्युइटी साठी पात्र ठरतात कारण की हा कालावधी सुद्धा पाच वर्ष मानला जातो.
पण जर एखाद्या कर्मचाऱ्याने चार वर्षे आणि 7 महिने काम केले असेल तर अशा कर्मचाऱ्याला ग्रॅच्युइटी मिळत नाही कारण की हा सेवा कालावधी फक्त चार वर्षाचा समजला जातो.
इथे एक गोष्ट विशेष नमूद करण्यासारखी ती म्हणजे नोटीस पिरियड हा देखील सेवा कालावधीमध्ये गणला जातो. आता आपण पन्नास हजार शेवटचा पगार आणि पंधरा वर्षे सेवा दिलेल्या कर्मचाऱ्याला किती ग्रॅच्युईटी मिळणार हे फॉर्म्युल्यानुसार समजून घेऊयात.
50 हजार रुपये शेवटचा पगार असेल आणि जर कर्मचाऱ्यांनी 15 वर्षे काम केलेले असेल तर त्याला (50,000)×(15)×(15/26) = 4,32,692 रुपये ग्रॅच्युईटी म्हणून मिळणार आहेत.