40 हजार पगार असणाऱ्या कर्मचाऱ्याला किती ग्रॅच्युईटी मिळणार? पहा….

अनेक कर्मचारी सेवानिवृत्तीच्या किंवा नोकरी सोडताना मिळणाऱ्या ग्रॅच्युईटीबाबत उत्सुक असतात. ग्रॅच्युईटी म्हणजे काय आणि ती कशी मिळते, याविषयी माहिती असणे सुद्धा महत्त्वाचे आहे. भारतात ग्रॅच्युईटी पेमेंट कायदा, 1972 अंतर्गत हा लाभ दिला जातो. कोणत्याही संस्थेत सलग पाच वर्षे सेवा दिल्यानंतर कर्मचाऱ्याला हा हक्क प्राप्त होतो.

Published on -

Gratuity Money : सरकारी तसेच खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर वेगवेगळे लाभ दिले जात असतात. ग्रॅच्युईटीच्या लाभाचा देखील त्यामध्ये समावेश होतो. ग्रॅच्युईटी म्हणजे काय ? तर सोप्या शब्दात, एखाद्या खाजगी किंवा सरकारी कंपनीत ठराविक वेळेसाठी काम केल्याबद्दल दिले जाणारे बक्षीस म्हणजे ग्रॅज्युटी असे आपण म्हणू शकतो.

अनेक कर्मचारी सेवानिवृत्तीच्या किंवा नोकरी सोडताना मिळणाऱ्या ग्रॅच्युईटीबाबत उत्सुक असतात. ग्रॅच्युईटी म्हणजे काय आणि ती कशी मिळते, याविषयी माहिती असणे सुद्धा महत्त्वाचे आहे. भारतात ग्रॅच्युईटी पेमेंट कायदा, 1972 अंतर्गत हा लाभ दिला जातो. कोणत्याही संस्थेत सलग पाच वर्षे सेवा दिल्यानंतर कर्मचाऱ्याला हा हक्क प्राप्त होतो.

ग्रॅच्युईटी कशी मोजली जाते ?

ग्रॅच्युईटीची गणना करण्याचा फॉर्म्युला सोपा आहे : शेवटचा पगार × (काम केलेली वर्षे) × (15/26)

म्हणजेच, जर एखाद्या कर्मचाऱ्याचा शेवटचा मासिक पगार 40,000 रुपये असेल आणि त्याने 20 वर्षे सेवा दिली असेल, तर त्याला मिळणारी ग्रॅच्युईटी = 40,000 × 20 × 15/26 = 4,61,538 रुपये

ग्रॅच्युईटीबाबत महत्त्वाचे नियम

1.अधिकतम मर्यादा – सरकारी नियमानुसार ग्रॅच्युईटीची कमाल मर्यादा सध्या 20 लाख रुपये आहे.

2. कर सवलत – 20 लाखांपर्यंतची ग्रॅच्युईटी करमुक्त असते.

3. 5 वर्षांच्या सेवेनंतरच पात्रता – 5 वर्षांपेक्षा कमी सेवा दिल्यास ग्रॅच्युईटी मिळत नाही (काही अपवाद वगळता). चार वर्षे आणि आठ महिने सेवा दिलेली असेल तर ती सेवा पाच वर्षे मानले जाते. मात्र चार वर्षे आणि सात महिने सेवा दिलेली असेल तर ती सेवा फक्त चार वर्षे मानली जाते.

4. मृत्यू किंवा अपंगत्वाच्या परिस्थितीत – कर्मचारी सेवेतील 5 वर्षे पूर्ण नसली तरी वारसांना ग्रॅच्युईटी दिली जाऊ शकते.

ग्रॅच्युईटीसाठी अर्ज कसा करावा?

सेवानिवृत्ती किंवा नोकरी सोडताना कंपनीच्या एचआर विभागाकडे अर्ज करावा. आवश्यक कागदपत्रांसह अर्ज भरून दिल्यानंतर 30 दिवसांत रक्कम मिळते. काही कंपन्या स्वयंचलित प्रणालीतून ही प्रक्रिया पूर्ण करतात.

ग्रॅच्युईटी मिळवण्यासाठी महत्त्वाचे टिप्स

दीर्घकालीन स्थिर नोकरी केल्यास ग्रॅच्युईटीचा लाभ मोठ्या प्रमाणात मिळतो. ज्या कंपनीत ग्रॅच्युईटी योजना लागू नाही, तेथे काम करताना कराराची माहिती घ्यावी. ग्रॅच्युईटीबाबत कोणत्याही समस्येसाठी कामगार न्यायालयाचा पर्याय उपलब्ध आहे. ग्रॅच्युईटी ही कर्मचाऱ्यांसाठी मोठा आर्थिक आधार असतो.

यामुळे दीर्घ सेवेनंतर आर्थिक स्थिरता मिळण्यास मदत होते. 40 हजार रुपये पगार असलेल्या कर्मचाऱ्याला, सेवेनुसार किती ग्रॅच्युईटी मिळेल हे वरील फॉर्म्युल्याद्वारे सहज कळू शकते. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी आपल्या सेवा वर्षांनुसार ग्रॅच्युईटी किती मिळू शकते याचा अंदाज घेणे आवश्यक आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!