Gratuity Rule : केंद्रातील मोदी सरकारने 2025 मध्ये आत्तापर्यंत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी अनेक मोठमोठे निर्णय घेतले आहेत. हे वर्ष सरकारी आणि खाजगी कर्मचाऱ्यांसाठी फायद्याचे ठरले आहे.
खरे तर तीन नोव्हेंबर 2025 रोजी केंद्रातील सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला अधिकृतरित्या मंजुरी दिली. दरम्यान नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात खाजगी कर्मचाऱ्यांसाठी लागू असणाऱ्या कामगार कायद्यांमध्ये सुद्धा महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे.

नव्या बदलांमुळे आता कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युईटीचा लाभ मिळवण्यासाठी सलग पाच वर्षे काम करण्याची गरज राहिलेली नाही. आता एक वर्ष काम करणाऱ्यांना सुद्धा हा लाभ दिला जाणार आहे.
आधी 4 वर्ष अन 7 महिने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पाच वर्ष समजून ग्रॅच्युटीचा लाभ दिला जात होता. पण आता फक्त एक वर्ष काम केलेले असेल तरीसुद्धा याचा लाभ मिळू शकणार आहे.
ग्रॅच्यूटीचा लाभ नोकरी सोडल्यानंतर किंवा रिटायरमेंट नंतर मिळतो. एकाच कंपनीत सलग काम केल्याच्या मोबदल्यात कंपनीकडून बक्षीस म्हणून ही रक्कम दिली जाते. ही कर्मचाऱ्यांसाठी एका प्रकारची भेट असते.
सर्व फॅक्टरी, कारखाणे, खाणी, तेल क्षेत्रे, बंदरे आणि रेल्वेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना हा लाभ मिळत असतो. एवढेच नाही तर दहापेक्षा अधिक कामगार असणाऱ्या दुकानांमधील कर्मचाऱ्यांना पण याचा लाभ मिळतो.
दरम्यान आता आपण नव्या नियमानुसार एक वर्ष, दोन वर्ष, तीन वर्षे, चार वर्ष किंवा पाच वर्षे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना किती ग्रॅज्युएटी मिळू शकते याची माहिती पाहणार आहोत.
ग्रॅच्युईटी मोजण्याचा फॉर्मुला
(शेवटचा पगार)x(15/26) x (कंपनीत काम केलेल्या वर्षांची संख्या) हा ग्रॅच्युइटी मोजण्याचा फॉर्मुला आहे.
जर एखाद्याने एका कंपनीत 5 वर्षे काम केले असेल आणि तुमचा शेवटचा पगार 60 हजार रुपये असेल तर 60,000 x(15/26) x 5 = एक लाख 73 हजार 76 रुपये ग्रॅच्युइटी म्हणून मिळणार आहे.
दरम्यान आता नव्या नियमानुसार जर एखाद्याने एका कंपनीत 1 वर्ष काम केले तर नवीन कामगार संहितेनुसार मूळ पगार हा एकूण पगाराच्या 50 टक्के असायला हवा.
म्हणजे जर पगार 60 हजार रुपये असेल आणि त्याने एक वर्ष काम केले तसेच त्याचा मूळ पगार 30,000 असेल तर त्याला ग्रॅच्युटीचा लाभ मिळणार आहे.
पाच वर्षांपेक्षा कमी काम केल्यास किती मिळणार?
एखाद्याला साठ हजार रुपये पगार असेल आणि त्याने पाच वर्षांपेक्षा कमी काम केले असेल तर त्याला किती ग्रॅच्युटी मिळेल याची माहिती आता आपण पाहणार आहोत.
4 वर्ष : (30,000 × 15 × 4) ÷ 26 = 69 हजार 230 रुपये.
3 वर्ष : 30,000 × 15 × 3) ÷ 26 = 51 हजार 923 रुपये.
2 वर्ष : 34 हजार 615 रुपये.
1 वर्ष : 17 हजार 307 रुपये.













