Gratuity Rules 2025 : खाजगी तसेच सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटी दिली जाते. कंपनीत एका ठराविक कालावधीसाठी काम केल्याबद्दल कंपनीकडून बक्षीस म्हणून एक निश्चित रक्कम दिली जाते. यालाच ग्रॅच्युइटी असं म्हणतात.
कर्मचार्यांना त्याच्या उत्कृष्ट सेवांच्या मोबदल्यात ग्रॅच्युइटी दिली जाते. पण ग्रॅच्युइटीचे काही नियम आहेत. या नियमाचे पालन करणे आवश्यक आहे. नियमानुसार, जेव्हा आपण सलग 5 वर्षे कंपनीत काम करता तेव्हा आपण ग्रॅच्युइटीचे हक्कदार बनतो.
अशा परिस्थितीत अनेकांच्या माध्यमातून जर एखाद्या कर्मचाऱ्यांनी पाच वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी नोकरी केली असेल तर त्याला हा लाभ मिळणार का असा प्रश्न उपस्थित केला जात होता. दरम्यान याबाबतही नियमांमध्ये तरतुदी आहेत.
जर एखाद्या कर्मचार्याने एखाद्या कंपनीत 4 वर्षे आणि 11 महिने काम केले असेल, म्हणजे पाच वर्षे पूर्ण होण्यास फक्त 1 महिना कमी असेल, तर अशा परिस्थितीत कंपनी त्याला ग्रॅच्युटीचा लाभ देते का ? असे सुद्धा विचारले जात होते.
आता आपण याच बाबत कर्मचार्यांना माहित असावेत असे असे नियम समजून घेणार आहोत. नियमानुसार, जर एखाद्या कर्मचार्याने 4 वर्ष 8 महिने कंपनीत काम केले असेल तर त्याची नोकरी 5 वर्षांची मानली जाईल आणि त्याला 5 वर्षात ग्रॅच्युइटीची रक्कम दिली जाते. परंतु जर नोकरी यापेक्षा कमी वेळ केली असेल तर म्हणजेच 4 वर्षे 7 महिने किंवा चार वर्षे साडेसात महिने आहेत, तर ती केवळ 4 वर्षे मानली जाईल आणि अशा परिस्थितीत त्यास ग्रॅच्युइटी दिली जाणार नाही.
महत्त्वाची बाब म्हणजे नोटीस पिरियड सुद्धा गॅचुटीचा कालावधी मोजताना ग्राह्य धरला जातो. समजा आपण कंपनीत 4 वर्षे 6 महिने काम केले अन आपण राजीनामा दिला आहे, परंतु राजीनामा दिल्यानंतर आपणांस संपूर्ण दोन महिन्याचा सूचनेचा कालावधी म्हणजेच नोटीस पिरियड देण्यात आलाय.
अशा परिस्थितीत, कंपनीमधील आपली एकूण सेवा 4 वर्षे आणि 8 महिने होती. म्हणजे असा कर्मचारी ग्रॅज्युटी साठी पात्र राहील. महत्वाची बाब अशी की नोकरी दरम्यान एखादा कर्मचारी मरण पावला तर नोकरीची स्थिती म्हणजेच त्याने किती वर्ष काम केले आहे हे ग्राह्य धरले जाणार नाही आणि अशा परिस्थितीत, मयत कर्मचार्यांच्या खात्यात ग्रॅच्युइटीची रक्कम जमा होते.