Maharashtra Railway News : नवीन वर्ष सुरू होण्यासाठी आता अवघ्या काही दिवसांचा काळ बाकी आहे आणि यामुळे सध्या संपूर्ण देशभर उत्साहाचे वातावरण पाहायला मिळतं आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अनेकजण पिकनिकचा प्लॅन बनवत आहेत. अशातच राज्यातील पर्यटकांसाठी आणि रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे.
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी ज्या पर्यटकांना राजस्थान तसेच गोव्याला जायचं असेल त्यांच्यासाठी ही बातमी अधिक खास ठरणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार कोकण रेल्वे मार्गावर रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून विशेष गाडी चालवली जाणार आहे.

राजस्थानातील जयपूर मधील खातेपुरा ते मडगाव जंक्शन यादरम्यान ही नवीन एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार असून या विशेष रेल्वे गाडीला महाराष्ट्रातील कोंकण विभागातील अनेक महत्त्वाच्या स्टेशनवर थांबा मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही गाडी विशेष शुल्कासह चालवली जाणार असून आज आपण या गाडीचे वेळापत्रक तसेच ही गाडी कोणकोणत्या स्थानकावर थांबणार याची डिटेल माहिती या लेखातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. ही गाडी महाराष्ट्रातून राजस्थान तसेच गोव्याला जाणाऱ्या पर्यटकांसाठी अधिक खास ठरणार आहे.
कसे राहणार विशेष गाडीचे वेळापत्रक
जयपूर येथील खातीपुरा रेल्वे स्थानकावरून 28 डिसेंबर 2025 रोजी संध्याकाळी चार वाजून पन्नास मिनिटांनी ही विशेष गाडी सोडली जाणार आहे आणि तिसऱ्या दिवशी पहाटे पावणे पाच वाजेच्या सुमारास ही गाडी मडगाव जंक्शनला पोहोचणार आहे. तसेच 30 डिसेंबर 2025 रोजी मडगाव जंक्शन येथून पहाटे पावणे सहा वाजेच्या सुमारास ही विशेष गाडी सोडली जाणार आहे आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सव्वाचार वाजता गाडी जयपूर येथील खातीपुरा रेल्वे स्थानकावर पोहोचेल.
कोणकोणत्या स्थानकावर थांबणार विशेष गाडी
जयपूर ते गोवा यादरम्यान चालवली जाणारी विशेष गाडी या मार्गावरील अनेक महत्त्वाच्या स्थानकावर थांबा घेणार आहे. या गाडीला कोकण रेल्वे मार्गावरील अनेक स्थानकांवर थांबा मंजूर झाला आहे. त्यामुळे कोकणातील रेल्वे प्रवाशांची देखील मोठी सोय होणार आहे. या गाडीला जयपूर जंक्शन, किशनगड, अजमेर जंक्शन, बिजायनगर, भिल्वाडा, चित्तोडगड, रतलाम जंक्शन, वडोदरा जंक्शन, सुरत, वसई रोड जंक्शन, पनवेल जंक्शन, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवी आणि करमळी या महत्त्वाच्या स्टेशनवर थांबा मंजूर करण्यात आला आहे.