ब्रेकिंग ! आता समृद्धी महामार्गाप्रमाणे राज्यातील ‘या’ दोन शहरादरम्यान उभारला जाणार ग्रीन फिल्ड एक्सप्रेस-वे, एकनाथ शिंदेचीं घोषणा

Ajay Patil
Updated:

Greenfield corridor : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मोठी घोषणा केली आहे. विकासाला चालना देण्यासाठी लवकरच समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर अजून एक ग्रीनफिल्ड कॉरिडोर महाराष्ट्रात उभारला जाणार असल्याच मुख्यमंत्री महोदय यांनी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मते, कोकणात मत्स्य व्यवसायाला आणि पर्यटन व्यवसायाला मोठी संधी आहे.

हीच गोष्ट डोळ्यासमोर ठेवून कोकणाचा विकास करण्याचे सरकारचे धोरण असल्याचे त्यांनी सांगितले. याचा अनुषंगाने आपण लवकरच सिंधुदुर्ग ते मुंबई असा ग्रीनफिल्ड कॉरिडॉर विकसित करणार असल्याची घोषणा देखील त्यांनी यावेळी केली. विशेष म्हणजे हा ग्रीनफिल्ड कॉरिडॉर राजधानी मुंबई ते उपराजधानी नागपूर यांदरम्यान उभारण्यात आलेल्या समृद्धी महामार्ग प्रमाणे विकसित केला जाणार असल्याची माहिती शिंदे यांनी दिली.

विशेष म्हणजे हा प्रकल्प केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीने पूर्ण केला जाणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले. श्री भराडी देवी यात्रोत्सवानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आंगणेवाडी या ठिकाणी देवीच्या दर्शनाला आले होते. यावेळी आंगणेवाडी ग्रामस्थांच्या माध्यमातून मुख्यमंत्री महोदय यांचा सत्कार करण्यात आला. या सत्कार प्रसंगी त्यांनी सिंधुदुर्ग ते मुंबई असा ग्रीनफिल कॉरिडॉर विकसित करू अशी घोषणा केली. मुख्यमंत्री महोदय म्हटले की कोकणाला 720 किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभली आहे.

अशी विस्तृत किनारपट्टी लाभली असल्याने या ठिकाणी मत्स्य व्यवसायाला मोठा भाव आहे. याशिवाय या ठिकाणी पर्यटन आणि कृषी क्षेत्राला देखील मोठा स्कोप असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी मुंबई गोवा महामार्गाबाबत देखील एक मोठी अपडेट दिली. मुख्यमंत्री महोदय यांनी सांगितल्याप्रमाणे मुंबई गोवा महामार्गाचे जे काही चौपदरीकरण काम सुरू आहे ते पूर्ण करण्यासाठी युद्ध पातळीवर काम सुरू आहे.

तसेच कोकणाच्या विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी सिंधुदुर्ग ते मुंबई ग्रीनफिल्ड कॉरिडॉर केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या वतीने विकसित केला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. निश्चितच मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितल्याप्रमाणे जर सिंधुदुर्ग आणि मुंबई दरम्यान ग्रीनफिल्ड कॉरिडॉर उभारला गेला तर यामुळे कोकणातील विकासाला मोठी चालना लाभणार आहे.

पुणे-अहमदनगर-औरंगाबाद महामार्गसाठी आवश्यक निधीची झाली अर्थसंकल्पात तरतूद ; आता ‘या’ गावात होणार भूसंपादन

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe