अक्षय तृतीयाला एक डझन हापूस आंब्यासाठी मोजावे लागणार ‘इतके’ रुपये ! भाव कमी होणार की वाढणार ? वाचा…

लवकरच देशात अक्षय तृतीयाचा मोठा सण साजरा होईल. अक्षय तृतीयाला महाराष्ट्रात आमरस बनवण्याची रूढी आहे. यामुळे दरवर्षी अक्षय तृतीयेच्या सणाच्या काळात आंब्याची मागणी वाढते आणि बाजार भाव सुद्धा वाढतात. अशा परिस्थितीत यंदा अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर हापूस आंब्याला काय दर मिळणार? याबाबत व्यापारी आणि विक्रेत्यांकडून काय सांगितले जात आहे याचीच माहिती आज आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.

Published on -

Hapus Mango Rate : महाराष्ट्रात नुकताच गुढीपाडव्याचा मोठा सण साजरा झाला, अन आता महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभरात येत्या काही दिवसांनी अक्षय तृतीयेचा सण साजरा होणार आहे. 30 एप्रिल 2025 रोजी अक्षय तृतीयाचा मोठा सण साजरा केला जाणार आहे.

खरेतर अक्षय तृतीयाच्या दिवशी महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये आमरसचा बेत आखला जातो. अशा परिस्थितीत आज आपण अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर हापूस आंब्याला काय दर मिळू शकतो? हापूसचे रेट आगामी काळात कमी होणार की वाढणार? याचा आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

आंब्याला सध्या काय दर मिळतोय ?

गेल्या आठवड्याच्या तुलनेत सोलापूरच्या बाजारपेठेत या आठवड्यामध्ये हापूससहित आंब्याचा सर्व प्रकारच्या प्रजातींच्या आंब्याचे रेट कमी झाले आहेत. सोलापूर मध्ये विविध प्रजातींच्या आंब्याची मोठ्या प्रमाणात आवक होत असून यामुळे दरात कपात झाली आहे.

सध्या बाजारात कोकण, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगाना येथून आंब्यांची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे आणि यामुळे या आठवड्यात आंब्याचे रेट कमी झाले आहेत.

गेल्या आठवड्याच्या तुलनेत आंब्याच्या दरात तब्बल 25 ते 30 टक्क्यांची घसरण झाली असल्याची माहिती व्यापाऱ्यांकडून आणि विक्रेत्यांकडून देण्यात आली आहे. सध्या बाजारात हापूसची आवक मोठ्या प्रमाणात वाढली असून आवक वाढली असल्याने हापूसचे दर कमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार सोलापूरच्या बाजारांमध्ये सध्या कोकणातील रत्नागिरीचा हापूस 500 ते 1000 रुपये प्रति डझन, कर्नाटकी हापूस 200 ते 600 रुपये प्रति डझन आणि अलिबाग हापूस 400 ते 600 रुपये प्रतिसाद आहे या दरात उपलब्ध आहे.

याशिवाय बदाम आंबा 70 ते 100 रुपये प्रति किलो, लालबाग शंभर ते 120 रुपये प्रति किलो, मलिका शंभर रुपये किलो आणि केसर 120 ते 160 रुपये प्रति किलो या दरात उपलब्ध आहे.

भाव कमी होणार का वाढणार?

गेल्या आठवड्याच्या तुलनेत सध्या आंब्याचे रेट 25 ते 30 टक्क्यांनी कमी झाले आहेत. हापूस सहित सर्वच प्रकारच्या आंब्यांचे रेट कमी झालेत. आवक वाढल्याने दर कमी झाले असावेत असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. जाणकार लोकांनी सांगितल्याप्रमाणे, सध्या तापमानात मोठी वाढ पाहायला मिळत असून यामुळे आंबे लवकर पिकत आहेत.

साहजिकच आंबे लवकर पिकत असल्याने त्याची हार्वेस्टिंग सुद्धा लवकरच करावी लागत आहे आणि यामुळे सध्या बाजारात आंब्याची आवक वाढली आहे. महत्त्वाचे म्हणजे आवक अशीच कायम राहिली तर आगामी काळात दर आणखी कमी होण्याची शक्यता आहे.

20 एप्रिलपासून अक्षय तृतीयाचा सण असल्याने बाजारात आंब्याची आवक आणखी वाढणार आहे आणि यामुळे अक्षय तृतीयाच्या सणाला म्हणजेच 30 एप्रिलला यंदा आंबे स्वस्त राहतील असा अंदाज व्यापारी तसेच विक्रेत्यांकडून व्यक्त होतोय.

पण यावर्षी आंब्याचा सिझन लवकरच संपणार असल्याचे बोलले जात आहे. वातावरणामध्ये होत असलेल्या बदलामुळे यावर्षी आंब्याचा सिझन 30 जून पर्यंत टिकणार नाही तर जूनच्या पहिल्या आठवड्यातच आंबे बाजारातून नाहीसे होतील असे दिसते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe