Hapus Mango Rate : गुढीपाडव्याचा सण नुकताच साजरा झाला आहे, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर दरवर्षी हापूस आंब्याचा हंगाम खऱ्या अर्थाने सुरू होत असतो. गुढीपाडव्याच्या आजपास हापूस आंबा बाजारात येतो आणि तेव्हापासूनच खऱ्या अर्थाने आंब्याचा हंगाम सुरू होत असतो. याही वर्षी गुढीपाडव्याच्या मुहूर्ता पासून बाजारात मोठ्या प्रमाणात हापूस आंब्याची आवक सुरू झाली.
सुरुवातीच्या टप्प्यात म्हणजेच गुढीपाडव्याच्या आसपास हापूस आंब्याला बाजारात मोठा दर मिळत होता. त्यावेळी हापूस सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेरच होता अस आपण म्हणू शकतो. मात्र आता हापूसची बाजारातील आवक आणखी वाढली आहे आणि याचा परिणाम म्हणून सध्या याचे दर सुद्धा कमी झाले आहेत.

खरे तर, येत्या काही दिवसांनी देशात अक्षय तृतीयाचा मोठा सण साजरा होईल. 30 एप्रिल 2025 रोजी यंदा अक्षय तृतीया साजरा होणार असून अक्षय तृतीयाच्या आधीच सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बातमी ती म्हणजे हापूसचे दर कमी झाले आहेत आणि अक्षय तृतीया पर्यंतदर असेच कमी राहण्याची शक्यता सुद्धा आहे.
खरे तर यावर्षी हापूसचा हंगाम लवकर संपू शकतो अशी सुद्धा शक्यता वर्तवण्यात आली आहे. जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्यावर्षी उशिरापर्यंत पाऊस सुरू राहिला आणि थंडीचे प्रमाण सुद्धा फारच कमी राहिले आणि याचाच परिणाम आंबा उत्पादनावर झाला. या प्रतिकूल हवामानाचा सर्वाधिक फटका हापूस आंब्याला बसला आणि यामुळे याचे उत्पादन यंदा फारच कमी आहे.
म्हणूनच सुरुवातीच्या टप्प्यात हापूसला चांगला भाव सुद्धा मिळाला. सुरुवातीला हापूसची बाजारात फारच लिमिटेड आवक होती आणि म्हणूनच रेट जास्त होते पण आता आवक वाढली आहे आणि उत्पादन कमी असताना सुद्धा भाव दबावात आले असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे.
तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे सध्या तापमानात मोठी वाढ होत आहे यामुळे वेळेआधीच हापूस पिकू लागला आहे. प्रतिकूल हवामानामुळे बाजारात कच्चामाल सुद्धा दिसतोय. कच्चामाल मोठ्या प्रमाणात बाजारात येतोय तसेच वाढत्या तापमानामुळे लवकरच हापूस तयार होतोय यामुळे सध्या बाजारात प्रचंड आवक होत असून
ह्याच कारणाने सध्या हापूसचे दर कमी झाले आहेत. महत्त्वाची बाब अशी की अक्षय तृतीयेच्या महूर्तावर सुद्धा यावर्षी हापूसचे दर नियंत्रणातच राहतील असे बोलले गेले आहे. दरम्यान, आता आपण सध्या बाजारात हापूस आंब्याला काय भाव मिळतोय याबाबत माहिती पाहणार आहोत.
हापूसचे रेट कसे आहेत?
सध्या बाजारात तयार झालेल्या हापूस आंब्याच्या पाच ते नऊ डझनच्या पेटीला 2500 ते 4500 रुपये असा दर मिळतोय. कच्चा हापूसच्या पाच ते नऊ डझनच्या पेटीला 1500 ते 3500 असा भाव मिळतोय. तसेच, तयार झालेल्या एक डझन हापूस आंब्याला सध्या 400 ते 800 रुपये असा दर मिळतोय.