अक्षय तृतीयाच्या आधीच हापूसचे भाव मोठ्या प्रमाणात गडगडले ! एका डझनसाठी आता फक्त ‘इतके’ पैसे लागणार

हापूसचा भाव पुन्हा एकदा कमी झाला आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर हापूसचे दर फारच वाढले होते. पण आता हंगाम जसाजसा पुढे जातोय तसेतसे दर कमी होत चालले आहेत. सध्या बाजारात आंब्यांची मोठी आवक सुरू आहे आणि यामुळे हापूस आंब्यासहीत सर्व प्रकारचे आंब्याचे रेट कमी झाले आहेत.

Published on -

Hapus Mango Rate : महाराष्ट्रात नुकत्याच काही दिवसांपूर्वी गुढीपाडव्याचा मोठा सण साजरा केला आहे. गुढीपाडव्याचा सण हा मराठी नववर्षाचा पहिला दिवस म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात आमरसाचा बेत आखला जातो.

गुढीपाडव्याच्या मुहूर्ताला साडेतीन मुहूर्तांपैकी एक असा शुभ मुहूर्त मानले जाते तसेच येत्या काही दिवसांनी अक्षय तृतीया चा सण साजरा होणार असून हा सुद्धा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. या दिवशी देखील गुढीपाडव्याच्या सणाप्रमाणेच मोठ्या प्रमाणात आमरसाचा बेत आखला जातो.

दरम्यान अक्षय तृतीयेच्या आधीच आंब्याच्या रेटमध्ये कपात झालेली पाहायला मिळत आहे. पुणे येथील मार्केट यार्ड अक्षय तृतीयाच्या आधीच हापूस आंब्याचे रेट कमी झाले असून यामुळे ग्राहकांना दिलासा मिळेल असे बोलले जात आहे. खरे तर दरवर्षी अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर हापूस आंब्याचे रेट वाढत असतात मात्र यावेळी हापूस आंब्याचे रेट अक्षय तृतीयाच्या आधीच कमी झाले आहेत.

महत्त्वाची बाब अशी की आगामी काळात सुद्धा दर दबावत राहतील असे बोलले जात असल्याने ग्राहकांना यावेळी दिलासा मिळणार असे चित्र तयार झाले आहे. यावर्षी अक्षय तृतीयाचा सन 30 एप्रिल 2025 रोजी साजरा होणार असून हा सण अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपला आहे. आता आपण पुणे मार्केट यार्ड मध्ये हापूस आंब्याला नेमका काय दर मिळतोय याचा आढावा घेणार आहोत.

हापूसचे दर कसे आहेत? 

पुणे मार्केटयार्ड फळ बाजारात पणन मंडळ व वखार महामंडळाकडून राज्य पणन महामंडळाच्या वतीने शेतकऱ्यांचा माल थेट ग्राहकापर्यंत पोहोचवला जातोय आणि यामुळे या ठिकाणी ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी सुद्धा होत आहे.

महत्त्वाचे म्हणजे गेल्या काही दिवसांपासून आंब्याची आवक वाढलेली आहे आणि याचा परिणाम म्हणून भाव दबावात आले आहेत. आंब्याचे दर चारशे रुपयांपासून ते आठशे रुपये प्रति डझन पर्यंत आहेत. तयार हापूसच्या रेट बाबत बोलायचं झालं तर या ठिकाणी एक डझन हापूस आंब्याचा रेट 400 ते 800 रुपये इतका आहे.

कच्चा हापूसची पाच ते नऊ डझनची पेटी यावेळी पंधराशे ते 3500 रुपयांना उपलब्ध होत आहे. तसेच तयार झालेल्या हापूसची पाच ते नऊ डझन ची पेटी यावेळी 2500 ते 4500 रुपयांना उपलब्ध होत असून यामुळे ग्राहक सध्या आंबे खरेदीसाठी गर्दी करत आहेत.

खरे तर यंदा हापूसचा हंगाम फक्त 15 मे 2025 पर्यंत सुरू राहणार असल्याचे बोलले जात असल्याने हा काळ आंबे खाण्यासाठी सर्वोत्कृष्ट राहील आणि यामुळे ग्राहक सुद्धा सध्या मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News